शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी नोंदीचा अहवाल येत्या शनिवारी शिंदे समितीला सादर करणार

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 7, 2023 17:44 IST

जिल्ह्यात लाखाहून अधिक कुणबी नोंदी सापडल्या

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठीचा महत्वाचा पुरावा ठरणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी दाखल्याच्या नोंदीचा अहवाल शनिवारी (दि.९) राज्य शासनाच्या शिंदे समितीला सादर होणार आहे. ही समिती कोल्हापूर दौऱ्यावर येणार होती मात्र हा दौरा रद्द झाला असून जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे पुण्याला जाऊन समितीला जिल्ह्यात सापडलेल्या नोंदी व अभिप्रायासह आपला अहवाल सादर करतील. जिल्ह्यात लाखाहून अधिक कुणबी नोंदी सापड़ल्या आहेत.मराठा आरक्षणासाठी राज्यात मराठा-कुणबी जातीच्या नोंदीची शोधमोहिम हाती घेण्यात आली. कोल्हापुरात देखील १९६७ पूर्वीचे पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानकालीन सनदा, राष्ट्रीय दस्ताऐवज हे कागदोपत्री पुरावे शोधण्याचे काम गेले दीड महिना सुरू होते. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला होता. या विभागाकडून सुरुवातीला रोजच्या रोज सापडलेल्या कुणबी दाखल्यांची संख्या जाहीर केली जात होती. तहसिल कार्यालयाांकडील रेकॉर्डमधून सर्वाधीक नोंदी सापडल्या यासह भूमी अभिलेख, मुद्रांक शुल्क, महापालिका, नगरपालिका, शिक्षण, पुराभिलेख, कळंबा कारागृह, वक्फ बोर्ड, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अशा विविध कार्यालयांमध्ये कुणबी नोंदी शोधण्यात आल्या. आतापर्यंत जिल्ह्यात लाखाहून अधिक नोंदी सापडल्या आहे. मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यतेखाली समिती गठीत केली आहे. ही समिती कोल्हापूरला भेट देणार होती, मात्र हा दौऱा रद्द झाला असून जिल्हाधिकारी स्वत: शनिवारी (दि.९) अहवाल सादर करणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणCaste certificateजात प्रमाणपत्र