शिंदे फाउंडेशनतर्फे ३६९० शेणी दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:40+5:302021-05-17T04:22:40+5:30

कोल्हापूर : पाचगाव येथील आनंदराव श्रीपतराव शिंदे फाउंडेशनतर्फे येथे शेणी दान हा सामाजिक बांधीलकीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ...

Shinde Foundation donates 3690 sheni | शिंदे फाउंडेशनतर्फे ३६९० शेणी दान

शिंदे फाउंडेशनतर्फे ३६९० शेणी दान

कोल्हापूर : पाचगाव येथील आनंदराव श्रीपतराव शिंदे फाउंडेशनतर्फे येथे शेणी दान हा सामाजिक बांधीलकीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत ३६९० शेणी जमा करण्यात आल्या. या जमा शेणी रविवारी पंचगंगा स्मशानभूमीकडे सुपूर्द करण्यात आल्या.

मनपा प्रशासनाने स्मशानभूमीतील शेणींचा तुटवडा भरून काढण्यासाठी दानशूर व्यक्ती व संस्थांना शेणीदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शिंदे फाउंडेशन तर्फे हा उपक्रम राबविला. या जमा शेणी पंचगंगा स्मशानभूमी येथे सुपूर्द करण्यात आल्या.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन शिंदे, सरपंच संग्राम पाटील, एम. एस. पाटील, संदीप शिंदे, संजय शिंदे, अभय शिंदे, बबन पाटील, विजय शिंदे, राकेश गांजवे, सुरेश पाटील, राजू पाटील, उत्तम गाडगीळ, रविराज कुलकर्णी, शिवाजी जांभळे, आदी सर्व मॉर्निंग ग्रुप पाचगावच्या सभासदांनी परिश्रम घेतले.

Web Title: Shinde Foundation donates 3690 sheni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.