जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिंपी यांना मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST2021-07-08T04:16:59+5:302021-07-08T04:16:59+5:30
आजरा : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आजरा जि. प. सदस्य जयवंत शिंपी यांना मिळावे, अशी जोरदार मागणी होत आहे. आजरा ...

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिंपी यांना मिळावे
आजरा : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आजरा जि. प. सदस्य जयवंत शिंपी यांना मिळावे, अशी जोरदार मागणी होत आहे. आजरा नगरपंचायत झाल्यामुळे शिंपी यांना पुन्हा जिल्हा परिषदेची संधी मिळणार नाही. कागलमध्ये मंत्री, खासदार ही पदे आहेत. आजरा तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद द्यावे, यासाठी कार्यकर्त्यांचा नेत्यांवर दबाव वाढत आहे.
आजरा तालुका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून बालेकिल्ला आहे. पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. तालुका संघ, जनता बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असून साखर कारखान्यामध्ये दहा संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. गेल्या पंधरा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजऱ्याला जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळालेली नाही.
यापूर्वी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व विद्यमान जि. प. सदस्य उमेश आपटे यांना अध्यक्षपदाची, स्वर्गीय बळीरामजी देसाई जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, स्वर्गीय मुकुंद आपटे अर्थ व शिक्षण सभापती तर, जयवंत शिंपी यांनी बांधकाम समिती सभापतिपद भूषवले आहे.
शिंपी यांनी आपल्या बांधकाम समिती सभापतीच्या कालावधीत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमठविला आहे.
आजऱ्याला नगरपंचायत झाल्यामुळे यापुढे आजरा शहरातील नागरिकांना जि. प. व पंचायत समितीमध्ये जाता येणार नाही. सध्या आजरा जि. प. चे नेतृत्व जयवंत शिंपी करीत आहेत. त्यांना या वेळी अध्यक्षपद ही संधी न मिळाल्यास यापुढे ती मिळू शकणार नाही. यासाठी कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.
आजऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामगारमंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची भेट घेऊन जि. प. अध्यक्षपद जयवंत शिंपी यांना मिळावे, याबाबत जोरदार मागणी केली आहे. कागलमध्ये खासदार व मंत्रिपद आहे. बारामतीप्रमाणे विकासही झाला आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडण्यामध्ये ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी आजरा तालुक्याला या वेळी संधी दिल्यास राष्ट्रवादीचा बालेकल्ला पुन्हा एकदा भक्कम होण्यास मदत होणार आहे.