शिपुगडे तालमीचा ‘नेत्रदान-श्रेष्ठदान’ देखावा खुला
By Admin | Updated: September 1, 2014 17:30 IST2014-09-01T00:17:24+5:302014-09-01T17:30:09+5:30
अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी या तांत्रिक देखाव्याचे उद्घाटन केले. हा देखावा २५ बाय २० फूट रंगमंचावर आहे.

शिपुगडे तालमीचा ‘नेत्रदान-श्रेष्ठदान’ देखावा खुला
कोल्हापूर : नेत्रदानाचे महत्त्व सांगणारा ‘नेत्रदान-श्रेष्ठदान’ या तांत्रिक देखावा जुना बुधवार पेठेतील श्री शिपुगडे तालीम मंडळ संस्थेने केला आहे. आज, रविवारी मिरजकर तिकटी येथील ज्ञान प्रबोधिनी संचलित अंध शाळेतील विद्यार्थ्यांनी या तांत्रिक देखाव्याचे उद्घाटन केले. हा देखावा २५ बाय २० फूट रंगमंचावर आहे.
नारदमुनी पृथ्वीतलावर येऊन ऐतिहासिक वेगवेगळे दाखले देऊन मानवाचा मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होण्यासाठी नेत्रदानाचे महत्त्व सांगणारा हा देखावा आहे. १५७ वर्षांची सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या श्री शिपुगडे तालीम मंडळाने हा आगळावेगळा देखावा केला आहे. देखाव्यानिमित्त नेत्रदानाचे महत्त्व व जनजागृतीचे डिजिटल फलक परिसरात उभा करण्यात आले आहेत.
यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, नगरसेवक दिगंबर फराकटे, निशिकांत मेथे, प्रकाश गवंडी, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, ज्ञानदेव कळके, जुना बुधवार पेठ तालीम मंडळाचे अध्यक्ष संभाजी पाटील, अभियंता आर. के.जाधव-मगदूम, तालीम मंडळाचे अध्यक्ष अमोल डांगे, उपाध्यक्ष प्रशांत कुरणे, सुरेश साळोखे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, नागेश घोरपडे, नीलेश जाधव, बशीर हेर्लेकर, पिंटू खडके, बबलू रोटे, सतीश डांगे, आदी उपस्थित होते. दरम्यान, रविवारी रात्री अंध मुलांचा वाद्यवृदांचा व पी. कुमार यांचा ‘हसा-रे-हसा’ हा कार्यक्रम झाला.