माता-पित्यांचे संस्कार हीच शिदोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:26 IST2021-09-21T04:26:40+5:302021-09-21T04:26:40+5:30
नूल येथील ‘ब्रम्हा’ क्लासेसतर्फे आयोजित गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणप्रसंगी ते बोलत होते. श्री रामनाथगिरी मठाचे मठाधिपती भगवानगिरी महाराज ...

माता-पित्यांचे संस्कार हीच शिदोरी
नूल येथील ‘ब्रम्हा’ क्लासेसतर्फे आयोजित गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणप्रसंगी ते बोलत होते. श्री रामनाथगिरी मठाचे मठाधिपती भगवानगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
संचालक प्रा. महेश कदम यांनी स्वागत केले. त्यांचे वडील शामराव कदम यांच्या षट्यब्धपूर्तीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, प्रा. मंगलकुमार पाटील, भगवानगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास जितेंद्र शिंदे, शरद चौगुले, श्रीरंग चौगुले, जोतीराम रावण, विजय रावण, मल्हारराव शिंदे उपस्थित होते. लता सूर्यवंशी, प्रेमला कदम यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र गायकवाड यांनी आभार मानले.
फोटो ओळी : नूल (ता. गडहिंग्लज) येथे ब्रम्हा क्लासेसतर्फे शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी विद्यार्थी व मान्यवर.
क्रमांक : २००७२०२१-गड-१५