वसंतराव चौगुले कामगार मंडळातर्फे शेणीदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:21 IST2021-05-16T04:21:49+5:302021-05-16T04:21:49+5:30

कोल्हापूर : श्री. वसंतराव चौगुले कामगार कल्याण मंडळाच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस दहा हजार शेणी दान करण्यात आल्या. सध्या कोरोनामुळे देशात ...

Shenidan by Vasantrao Chowgule Kamgar Mandal | वसंतराव चौगुले कामगार मंडळातर्फे शेणीदान

वसंतराव चौगुले कामगार मंडळातर्फे शेणीदान

कोल्हापूर : श्री. वसंतराव चौगुले कामगार कल्याण मंडळाच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस दहा हजार शेणी दान करण्यात आल्या.

सध्या कोरोनामुळे देशात हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. कोल्हापुरातही मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा स्मशानभूमीत रोज ४० ते ५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहेत. त्यामुळे लाकूड व शेणीचा तुटवडा भासत असल्याने शेणीदानसाठी महापालिका आयुक्तांनी आवाहन केले होते. त्यानुसार वसंतराव चौगुले सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार कल्याण मंडळाच्यावतीने स्मशानभूूमीस दहा हजार शेणी दान करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे सहायक सरव्यवस्थापक तुकाराम पाटील, शशिकांत मोरे, कर्ज विभाग व्यवस्थापक वसंतराव चव्हाण, मेढे, पंचगंगा स्मशानभूमीचे अधिकारी महेश भोसले आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : श्री. वसंतराव चौगुले कामगार कल्याण मंडळाच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस दहा हजार शेणी दान करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे सहायक सरव्यवस्थापक तुकाराम पाटील, शशिकांत मोरे, वसंतराव चव्हाण आदी उपस्थित होते. (फोटो-१५०५२०२१-कोल-वसंतराव चौगुले पतसंस्था)

Web Title: Shenidan by Vasantrao Chowgule Kamgar Mandal