शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

CoronaVirus Lockdown : ‘ती’ सहन करतेय ४२ वर्षांचा लॉकडाऊन, अस्मिता मारुलकर आणि कुटुंबीयांची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 18:46 IST

एकवीस दिवसांचा लॉकडाऊन पार करताना नागरिकांना उबग आला आहे. जीवन नकोसे झाल्याची भाषा अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळत आहे. मग विचार करा, वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने त्रस्त असलेली अस्मिता तब्बल ४२ वर्षे एका खुर्चीत ‘लॉकडाऊन’ आहे. खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतच्या प्रत्येक वेळी आईवडिलांची तिला मदत घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्दे‘ती’ सहन करतेय ४२ वर्षांचा लॉकडाऊनअस्मिता मारुलकर आणि कुटुंबीयांची कहाणी

सचिन भोसले कोल्हापूर : एकवीस दिवसांचा लॉकडाऊन पार करताना नागरिकांना उबग आला आहे. जीवन नकोसे झाल्याची भाषा अनेकांच्या तोंडी ऐकण्यास मिळत आहे. मग विचार करा, वयाच्या तिसऱ्या वर्षी ‘सेरेब्रल पाल्सी’ या आजाराने त्रस्त असलेली अस्मिता तब्बल ४२ वर्षे एका खुर्चीत ‘लॉकडाऊन’ आहे. खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतच्या प्रत्येक वेळी आईवडिलांची तिला मदत घ्यावी लागत आहे.अशा लॉकडाऊन झालेल्या साने गुरुजी वसाहत येथील क्रशर चौकालगतच्या एका कॉलनीतील ‘अस्मिता’ची कहाणी काही औरच आहे.अस्मिता ही रजनी व पंडित मारुलकर यांची एकुलती एक कन्या. जन्म १९७६ सालचा. नियमित मुलांसारखी ती बागडत होती. अचानकपणे १९७९ साली तिचे चालणे, बोलणे बंद झाले. ती केवळ हुंकार देऊ लागली. त्यानंतर आजतागायत ४२ वर्षांचा कालावधी गेला; ती अजूनही एका खुर्चीत अक्षरश: ‘लॉकडाऊन’ आहे.

 तिच्या खाण्यापिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंतचे सर्व सोपस्कर आईवडील करतात. त्यांची वयेही बघितली तर अनुक्रमे ७५ आणि ८० अशी आहेत. दोघेही न कंटाळता, केवळ ती पुन्हा पायावर उभी राहावी, या आशेने ही सेवा करीत आहेत. मारुलकर दाम्पत्याचा एकच कार्यक्रम म्हणजे अस्मिता पुन्हा उभी व्हावी, या आशेवर तिची एकसारखी सेवा, तीही न थकता करीत राहणे. दोघांनी तर कधी नातेवाइकांचे किंवा जवळच्या मंडळींचे लग्न, समारंभ, आदी पाहिलेलेच नाहीत. नातवंडांना खेळवायच्या वयात त्यांना मुलीला उचलावे लागत आहे. घरात काही बाजार वगैरे आणायचे म्हटले तर एकाला बाहेर जावे लागते, तर एकाला तिच्याबरोबर राहावे लागते.

गेल्या ४२ वर्षांनंतर मारुलकर पती-पत्नी आजही थकलेले नाहीत. केवळ त्यांची वये वाढली आहेत. त्यांचा उत्साह तर तरुण पिढीला लाजविणारा आहे. अस्मिता तर गेल्या ४२ वर्षांपासून एका खुर्चीत लॉकडाऊन आहे. अशा पद्धतीने लॉकडाऊन झालेल्या अस्मिताला आपण बरे होऊ, असा आशेचा किरण आहे. मग लोकांना २१ दिवसांचा लॉकडाऊन सहन का होईना?अस्मिताचे वडील पंडित मारुलकर हे शिवाजी विद्यापीठातून उपकुलसचिव म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना निवृत्तिवेतन मिळते. त्यांची एकच इच्छा आहे, ती म्हणजे त्यांच्या व पत्नी रजनी यांच्या पश्चात त्यांच्या निवृत्तिवेतनातून अस्मिताचा चरितार्थ चालविण्यास सरकारने परवानगी द्यावी.

गेली ४२ वर्षे माझी मुलगी एकाच खुर्चीत लॉकडाऊनचा अनुभव घेत आहे. दीर्घ कालावधीनंतर तिला व आम्हांला ती पुन्हा उभी राहील, हा आशेचा किरण आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनीही २१ दिवसांचा लॉकडाऊन पाळून आपल्यासह इतरांच्याही जिवाला जपले पाहिजे.- रजनी मारुलकर, अस्मिताची आई 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर