शंभर झाडे लावून त्यांनी केले बाळाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:00 PM2020-06-29T15:00:22+5:302020-06-29T15:00:29+5:30

अशा उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच कॉलनीमधील एकोपा वृद्धिंगत होऊन विविध विकासात्मक कामांना प्रोत्साहन मिळत राहील," अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

She planted a hundred trees and welcomed the baby | शंभर झाडे लावून त्यांनी केले बाळाचे स्वागत

शंभर झाडे लावून त्यांनी केले बाळाचे स्वागत

googlenewsNext

कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीचे सदस्य रोहित बापू कांबळे यांच्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला आल्याने रोहित कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांनी वडणगे येथील शिवपार्वती पार्क येथे राहत्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची शंभर झाडे लावून नवजात बालकाचे स्वागत केले.

करवीर पंचायत समितीचे सदस्य इंद्रजीत पाटील यांच्या हस्ते सोनचाफ्याचे झाड लावून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. "बाळाचे अशा प्रकारे झाडे लावून स्वागत करणे ही संकल्पना खूपच विधायक व आदर्शवत आहे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच कॉलनीमधील एकोपा वृद्धिंगत होऊन विविध विकासात्मक कामांना प्रोत्साहन मिळत राहील," अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

सचिन ओतारी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून कॉलनीमध्ये प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे उपस्थित सर्वांना आवाहन केले. याला प्रतिसाद म्हणून उपस्थित सर्वांनी शिवपार्वती पार्क प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निश्चय केला. उपक्रमाच्या सुरुवातीला सागर खुटाळे, ओंकार पाटील, एस. के. सुर्वे, दत्ता लोहार, सुधी ओतारी, नितीन पोवार, संतोष कदम, रामचंद्र कदम, राहुल शिंदे, रमेश बराले, संजय शेवाळे, बापू कांबळे, शहाजी पाटील, दिनकर मिसाळ, अजय ओतारी,  ऋतुराज आणि कृष्णा ओतारी किरण पाटील, संदीप करंबळे, श्रीधर शिंदे यांच्यासह अन्य नागरिकांनी परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छता मोहिमेसाठी विनामूल्य ट्रॅक्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल संजय पाटील व सर्वांसाठी विनामूल्य अल्पोपहार दिल्याबद्दल दिनकर मिसाळ यांचे उपस्थित सर्वांनी आभार व्यक्त केले.

Web Title: She planted a hundred trees and welcomed the baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.