निपाणीतून शशिकला ज्वोल्ले, काकासाहेब पाटील यांचे अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:53 IST2018-04-25T00:53:28+5:302018-04-25T00:53:28+5:30

निपाणीतून शशिकला ज्वोल्ले, काकासाहेब पाटील यांचे अर्ज दाखल
निपाणी : निपाणी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील, तर भाजपतर्फे शशिकला ज्वोल्ले यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला.
काकासाहेब पाटील यांनी सोमवारी सकाळी ११.४५ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, चिकोडी जिल्हा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, उत्तम पाटील, आदी उपस्थित होते.
भाजपतर्फे शशिकला ज्वोल्ले यांनी १२.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नगरसेवक राज पठाण, निरंजन कमते, सिद्धू नराटे, सतीश माने, आदी उपस्थित होते, तर दुसरा अर्ज जोल्ले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केला. यावेळी निपाणी शहर भाजपचे अध्यक्ष जयवंत भाटले, शशिकांत नाईक, बंदूक पाटील, आदी उपस्थित होते.