पन्हाळा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शरयू लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:20 IST2021-01-09T04:20:13+5:302021-01-09T04:20:13+5:30

पन्हाळा : पन्हाळा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसुराज्यशक्ती पक्षाच्या नगरसेवक शरयू लाड यांची बिनविरोध निवड ...

Sharu Lad as the Deputy Mayor of Panhala Municipal Council | पन्हाळा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शरयू लाड

पन्हाळा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शरयू लाड

पन्हाळा : पन्हाळा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसुराज्यशक्ती पक्षाच्या नगरसेवक शरयू लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगर परिषदेच्या सभागृहात झालेल्या सभेत ही निवड घोषित करण्यात आली. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी काम पाहिले.

पन्हाळा नगर परिषदेवर जनसुराज्यशक्ती पक्षाची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती आदी महत्त्वाची पदे जनसुराज्य पक्षाकडे आहेत. चेतन भोसले यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानुसार निवडणूक विभागाने उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नगर परिषदेला कळविला होता. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सभेत शरयू लाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने दुपारी एक वाजता नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी आजी-माजी नगरसेवक व जनसुराज्यशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो------- शरयू लाड

नगराध्यक्षा रुपाली धडेल व मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी नूतन उपनगराध्यक्षा शरयू लाड यांचे अभिनंदन केले.

Web Title: Sharu Lad as the Deputy Mayor of Panhala Municipal Council