शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- बालिंगा येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील दरोडा: शार्पशूटर अखेर जेरबंद

By उद्धव गोडसे | Updated: February 7, 2024 12:31 IST

मध्यप्रदेशातील मुरेना येथे कारवाई, आठ महिन्यांनी अटक करण्यात यश

कोल्हापूर : जून २०२३ मध्ये बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्समध्ये झालेल्या दरोड्यातील शार्प शूटरला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला अखेर यश आले.मध्यप्रदेशातील मुरेना येथून त्याला पथकाने जेरबंद केले. मुपेंद्र उर्फ राणा उर्फ पवन शर्मा (वय ३२, रा. मुरेना, जि. मुरैना, मध्यप्रदेश) असे अटकेतील शार्प शूटरचे नाव आहे. त्यानेच कात्यायनी ज्वेलर्सच्या मालकावर गोळी झाडून, ज्वेलर्सबाहेर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्याचा यापूर्वी उत्तुर (ता. आजरा) येथील दरोड्याच्या गुन्ह्यात सहभाग होता.कात्यायनी ज्वेलर्समध्ये ८ जून २०२३ रोजी पडलेल्या दरोड्यातील चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. त्या गुन्ह्यातील अन्य दोन संशयित पसार होते. त्यापैकी शार्प शूटर पवन शर्मा हा मध्य प्रदेशातील मुरेना येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुरेना येथे जाऊन शर्मा याला जेरबंद केले.त्याच्याकडून काही दागिने जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील शर्मा याच्या आणखी एका साथीदाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरोडेखोरांनी फिर्यादी रमेश शंकरजी माळी, त्यांचा मेहुणा जितेंद्र माळी यांना मारहाण करून रमेश माळी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांनी दुकानातील रोख दीड लाख रुपये आणि १ कोटी ८७ लाख रुपयांचे दागिने लंपास केले होते.एकूण पाच जणांना अटकदरोड्याच्या गुन्ह्यातील सतीश उर्फ संदीप सखाराम पोहाळकर (वय ३७, रा. कणेरकरनगर रिंगरोड, कोल्हापूर), विशाल धनाजी वरेकर (वय ३२, रा. कोपर्डे, ता. करवीर), अंबाजी शिवाजी सुळेकर (वय ४४, रा. पासार्डे, ता. करवीर) आणि अंकित उर्फ छोटू श्रीनिवास शर्मा (वय २३, रा. अम्बाह, जि. मुरेना, मध्यप्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली होती. आता पाचवा संशयित पवन शर्मा पोलिसांच्या हाती लागला. या गुन्ह्यातील आणखी एका संशयिताचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले.दरोड्यातील मुद्देमाल जप्तदरोड्यातील ३७ तोळे दागिने, एक कार, एक दुचाकी जप्त केली होती. ४ मोबाईल, १ वायफाय डोंगल, २ पिस्टल, ७ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, अंमलदार रामचंद्र कोळी, संजय कुमार, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस