'शरद'ला एनबीएकडून मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST2021-05-19T04:22:59+5:302021-05-19T04:22:59+5:30

यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सर्व विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ एक्रिडीशन (एन.बी.ए.) समितीकडून मानांकन ...

'Sharad' rated by NBA | 'शरद'ला एनबीएकडून मानांकन

'शरद'ला एनबीएकडून मानांकन

यड्राव : येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सर्व विभागांना नॅशनल बोर्ड ऑफ एक्रिडीशन (एन.बी.ए.) समितीकडून मानांकन प्राप्त झाले आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर एन.बी.ए. मानांकनाला महत्त्व आहे. शरद इंजिनिअरिंगमधील आता सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल या विभागांना तर यापूर्वी मेकॅनिकल, कॉम्प्युटर सायन्स या विभागांना मानांकन मिळाले आहे. यामुळे 'शरद पॅटर्न'च्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

एनबीए ही संस्था राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक अभ्यासक्रमांना मानांकन देण्याचे काम करते. समितीने ५ ते ७ मार्च या कालावधीत शरद इंजिनिअरिंगची शिक्षणप्रणाली, सर्व सुविधा, प्रत्येक विभागातील कागदपत्रांची तपासणी केली होती. यामध्ये टीचिंग-लर्निंग प्रोसेस, रिसर्च अँड कन्सल्टन्सी, स्टुडंट सक्सेस रेट, करिअर गाइडन्स, प्लेसमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यार्थ्यांचा फिडबॅक, आऊट कम बेस्ड एज्युकेशन याचे मूल्यमापन केले. त्याचबरोबर वर्कशॉप, ग्रंथालय, प्रथम वर्षाच्या सर्व प्रयोगशाळा, ऑफिस, जिमखाना, कँटिन, मुलांनी केलेले प्रोजेक्ट, सर्व विभागाचे लॅब आणि तेथील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती.

एनबीए मानांकन मिळालेल्या विद्यालयांना शासनाच्या विविध योजनेत सहभाग तसेच विद्यार्थ्यांना थेट परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेशाचा संधी मिळते. वाॅशिंग्टन अ‍ॅकॉर्डअंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा फायदा होतो.

मूल्यांकन यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, उपप्राचार्या एस. पी. कुर्लेकर, एन. बी. ए. समन्वयक प्रा. पी. एच. यादव, डॉ. ए. के. गुरव, डॉ. एस. टी. जाधव, डॉ. के. हुसेन, प्रा. डी. डी. शिंदे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी सर्वांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

---------------------------

कोट - शरद इन्स्टिट्यूटने पहिल्या दिवसापासूनच शैक्षणिक दर्जा उच्च ठेवला आहे. विद्यार्थी, शिक्षक, पालक व व्यवस्थापन यांच्या समन्वयामुळे यापूर्वी नॅक व गेल्याच वर्षी अ‍ॅटोनॉमस (स्वायत्त)चा दर्जा प्राप्त झाला असून आता सर्व विभागांना मानांकन मिळाल्याने गुणवत्तेचा मापदंड सिद्ध केला आहे. मूल्यांकनामुळे या कामाला प्रमाणपत्र मिळाले आहे.

- अनिल बागणे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर.

फोटो - १८०५२०२१-जेएवाय-०१-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल बागणे.

Web Title: 'Sharad' rated by NBA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.