शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

कोल्हापुरात गुरुवारपासून नेत्यांची मांदियाळी; शरद पवार, एकनाथ शिंदे यांचा दौरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:19 IST

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर राजकीयदृष्ट्या काहीसा शांत झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात पुन्हा राजकीय धुरळा उडणार आहे. येत्या गुरुवारपासून ...

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीनंतर राजकीयदृष्ट्या काहीसा शांत झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात पुन्हा राजकीय धुरळा उडणार आहे. येत्या गुरुवारपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे ही नेतेमंडळी जिल्ह्यात येत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना व्हाइट आर्मीच्या वतीने येत्या गुरुवारी (दि. २३) आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी शरद पवार गुरुवारी कोल्हापुरात येणार आहेत. त्यादिवशी त्यांचा कोल्हापुरात मुक्काम असून, शुक्रवारी ते सांगलीला रवाना हाेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही येत्या शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सरवडे (ता. राधानगरी) येथे राज्यातील आभार दौऱ्याचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. रुकडी (ता. हातकणंगले) येथील पंचकल्याण महोत्सवास शिंदे उपस्थितीत राहणार आहेत. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई या ग्रंथाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. न्यू पॅलेसच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवारEknath Shindeएकनाथ शिंदेSupriya Suleसुप्रिया सुळे