शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 11:11 IST

Sharad Pawar : राज्यात काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. 

Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभेच्या निवडणुका संपल्या, लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. आता काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी 'महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे', अशी मागणी केली आहे. यावर आता खासदार शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

'विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प मांडला'; शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला 

आज खासदार शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, खासदार शरद पवार म्हणाले, आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे, सामुहिक नेतृत्व हेच आमचं सूत्र आहे, असं शरद पवार म्हणाले.  

महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्रिपदावरुन चर्चा  सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

"विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणे धोका आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनही झालेलं आहे. अर्थातच तिघांचीही ताकद एकत्र होती. पण बिन चेहऱ्याचे सरकार, हे अजिबात चालणार नाही. लोक स्वीकारणार नाहीत. लोकांना चेहरा द्यावाच लागेल, असे संजय राऊत म्हणाले होते, यावरुन महाविकास आघाडीत आरोप-प्रत्यारोप झाले .

शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला

अर्थसंकल्पावर बोलताना शरद पवार म्हणाले, 'साधी गोष्ट आहे मी एखाद्या गोष्टीला १०० रुपये खर्च करणार म्हणालो आणि माझ्या खिशात ७० रुपये आहेत, तर मग मी १०० रुपये खर्च कसे करणार?, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला. 'पहिला प्रश्न हा आहे की तुमच्याकडे महसुली जमा किती आहे? दसरं महसुली खर्च किती होणार आहे? आणि जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतुद न करता खर्च करणार म्हटलं आणि विचारपूर्वक केलं असं म्हटलं तरी फारसा काही अर्थ लागत नाही, असंही शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी