शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साखर कामगारांच्या वेतन वाढीवर शरद पवार यांचा लवाद सर्वमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:10 IST

साखर संकुलात त्रिपक्ष समितीची चौथी बैठक निष्फळ

कोपार्डे (कोल्हापूर) : राज्यातील साखर कामगारांची वेतनवाढ व सेवाशर्तीसह इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाने नेमलेल्या त्रिपक्षीय समितीच्या झालेल्या बैठकीत वेतनवाढीवरील चर्चा निष्फळ ठरली. योग्य तोडगा निघत नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा लवाद साखर कारखाना प्रतिनिधी व साखर कामगाराच्या सदस्यांनी एकमताने मान्य केला आहे. या विषयी शरद पवार जो निर्णय देतील तो अंतिम राहणार असल्याचे बैठकीत ठरले.पुणे येथील साखर संकुलमध्ये राज्य सहकारी साखर कारखाना संघ व त्रिपक्षीय समितीचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौथी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वरील निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती.राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढ व अन्य मागण्यासाठीच्या यापूर्वीच्या कराराची मुदत ३१ मार्च २०२४ अखेर संपली होती. २०२४/२५ चा चालू हंगाम साखर कामगारांनी घेतलेल्या भूमिकेने अडचणीत येणार असल्याने शासनाने तातडीने त्रिपक्षीय समिती गठित केली. याला सात महिने उलटले असून बैठकीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची साखर कामगाराच्या प्रचलित वेतनात ४० टक्के वाढीची प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच अन्य मागण्यांवरही समितीमध्ये चर्चा झालेली असली तरी अद्याप तोडगा निघाला नसल्याने शरद पवार यांचा सर्वमान्य लवादाचा निर्णय झाला आहे.यावेळी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष राऊ शंकर पाटील, अविनाश आपटे, उपाध्यक्ष युवराज रनवरे, राजेंद्र तावरे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, डी.एम. निमसे, अशोकराव पवार, पी. के. मुडे, सरचिटणीस आनंदराव वायकर, कार्याध्यक्ष शिवाजी औटी, उपाध्यक्ष सत्यवान शिखरे आदी उपस्थित होते.