स्मशानभूमीचे रूप पालटले

By Admin | Updated: June 15, 2016 00:03 IST2016-06-14T21:29:12+5:302016-06-15T00:03:38+5:30

जोतिबा डोंगर : ‘सुंदर जोतिबा मिशन’च्या नेतृत्वाखाली युवा वर्गाचा पुढाकार

The shape of the graveyard changes | स्मशानभूमीचे रूप पालटले

स्मशानभूमीचे रूप पालटले

जोतिबा : जोतिबा डोंगरावरील स्मशानभूमीचे नंदनवन करण्यासाठी ‘सुंदर जोतिबा मिशन’च्या नेतृत्वाखाली युवा वर्गाने पुढाकार घेतला आहे . ग्रामस्थांकडून आर्थिक व वस्तु स्वरूपात देणगीचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जोतिबा डोंगराचा विकास करण्यासाठी आतापर्यंत अनेक योजना, समित्या स्थापन करण्यात आल्या. काही विकासकामे झाली. काही अर्धवट राहिली. नियोजन शून्य कारभारामुळे अनेक विकासकामे वापराविना धुळखात पडली. लाखो रुपयांचा चुराडा झाला. आता मात्र जोतिबा डोंगराचा विकास करण्यासाठी श्रमदान करून सुंदर जोतिबाचे स्वप्न साकार करण्यासाठी युवा वर्गाने पुढाकार घेतला आहे.
‘सुंदर जोतिबा मिशन’ची स्थापना करून स्मशानभूमीचे नंदनवन करण्याचे काम हाती घेतले. गावातील तरुण मंडळाना वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन केले. स्मशानभूमीत शंभर झाडांचे वृक्षारोपण केले. पाण्याचा हौद बांधला. झाडांना जाळीचे कुंपण घातले. कायस्वरूपी झाडाला पाणी मिळावे यासाठी थेट पाईपलाईन केली. स्मशानभूमीला तटबंदीचे काम सुरू आहे. आता जोतिबा डोंगर हिरवागार करण्यासाठी युवा वर्गाने कं बर कसली आहे.

Web Title: The shape of the graveyard changes