सरुड येथील चौंडेश्वरी मंदिरामध्ये शांकभरी पौर्णिमा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:12+5:302021-02-05T07:06:12+5:30
सरुड येथील चौंडेश्वरी मंदिरामध्ये देवीचा शांकभरी पौर्णिमा उत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...

सरुड येथील चौंडेश्वरी मंदिरामध्ये शांकभरी पौर्णिमा उत्साहात
सरुड येथील चौंडेश्वरी मंदिरामध्ये देवीचा शांकभरी पौर्णिमा उत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दरवर्षी या मंदिरामध्ये देवांग कोष्टी समाजाच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. गेली नऊ दिवस सकाळी चौंडेश्वरी देवीला अभिषेक घालून पुजारी दिलीप हावळ यांच्या हस्ते देवीची आकर्षक पूजा बांधण्यात येत होती. शांकभरी पौर्णिमेदिवशी पहाटे देवीला सार्वजनिक अभिषेक घालून देवीजी विविध फुले, फळे व १११ भाज्यांचा वापर करून पूजा बांधण्यात आली. या उत्सवानिमित्त आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण सप्ताहाची सांगता करण्यात आली. त्यानंतर देवीचा आरती सोहळा होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मधुकर टेके, शिवदास हजारे, महेश ढवळे, हरिभाऊ उकरांडे, सुनील टेके, दीपक हजारे, शिवाजी पाखले, पंडित ढवळे, बाबूराव कांबळे, रामकृष्ण सातपुते, सनी कांबळे, सुरेश हजारे, प्रमोद उकरांडे, अनिल वडेकर, मारुती कांबळे, कृष्णात कांबळे, प्रकाश कांबळे, शशिकांत लोले, आनंदा ठाणेकर, अजिंक्य कांबळे, महादेव सातपुते, सुरेश टेके, दीपक ढवळे, दत्ता कांबळे, संजय कांबळे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी २९ सरूड चौंडेश्वरी मंदिर
:
सरुड : येथे शांकभरी पौर्णिमेनिमित्त श्री चौंडेश्वरी देवीची विविध फळभांज्याच्या साहाय्याने बांधलेली पूजा.
(छाया : अनिल पाटील, सरुड)