शामराव साठे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:17 IST2021-06-20T04:17:12+5:302021-06-20T04:17:12+5:30
रुई (ता. हातकणंगले) येथील शामराव तोरबा साठे (वय ८४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे. त्यांच्या पश्चात तीन ...

शामराव साठे यांचे निधन
रुई (ता. हातकणंगले) येथील शामराव तोरबा साठे (वय ८४) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सुरेश आंबेकर
कोल्हापूर : शुक्रवार पेठ, पिवळावाडा येथील सुरेश लक्ष्मण आंबेकर (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
विलासराव पाटील
कोल्हापूर : तिरपण (ता. पन्हाळा) येथील विलासराव बापू पाटील (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे. ते डाॅ. माणिक पाटील तिरपणकर यांचे वडील होत.
हिराबाई बारड
कोल्हापूर : बेळवळे (बुद्रुक), ता. कागल येथील हिराबाई राऊ बारड (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मंगल करनाळे
कोल्हापूर : जवाहरनगरातील जगदंबा मंदिराजवळील मंगल पांडुरंग करनाळे (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
महेशकुमार गुडसे
कोल्हापूर : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील महेशकुमार आण्णासाहेब गुडसे (वय ३२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील असा परिवार आहे. महापालिकेचे लेखापाल श्रीकांत कानडे यांचे ते जावई होत.