शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
2
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
3
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
4
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
5
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
6
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
7
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
8
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
9
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
10
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
11
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
12
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
13
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
14
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
15
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
16
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
17
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
18
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
19
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
20
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या पोरी जगात भारी; शांभवी, सुहानीने गाजवली डर्ट ट्रॅक स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 13:47 IST

अतिशय धोकादायक, जीवाची बाजी लावत बुलेट रायडिंग, राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी  

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : अतिशय धोकादायक, जीवाची बाजी लावत बुलेट रायडिंग करून कोल्हापूरच्या दोन मुलींनी गोव्यात झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील डर्ट ट्रॅक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. पदकांची लयलूट करून आम्ही कोल्हापुरी देशात भारी असल्याचे दाखवून दिले आहे. शांभवी राहुल भोसले, सुहानी गौरव पाटील असे त्या मुलींची नावे आहेत. आतापर्यंत केवळ पुरुषांची मुक्तेदारी असलेल्या रायडिंग स्पर्धेत शांभवी या नोकरी करीत तर सुहानी विद्यार्थी असूनही चांगली कामगिरी करून आम्ही मुलीही कशात कमी नाही, हे दाखवून दिले आहे.गोव्यात हिल क्लाइंब रायडिंगमध्ये रस्ता नसलेल्या डोंगरात तर डर्ट ट्रक चिखल आणि मातीमध्ये स्पर्धा घेतली जाते. दोन्ही स्पर्धेत अपघात झाला तर हात, पाय मोडतात. हेल्मेट असले तरी मानेला जबर मार लागतो. यामुळे या दोन्ही स्पर्धेत सहभाग घेणे म्हणून जीवाची बाजी लावले, असेच समजले जाते. तरीही ३५० सीसीच्या बुलेटसारख्या अवजड दुचाकीवरून या दोघींनी डर्ट ट्रॅकमध्ये यश मिळवले आहे. सुहानी तर दीड किलोमीटर रस्ता नसलेल्या डोंगरातील हिल क्लाइंबमध्ये थरारक स्पर्धा जिंकली आहे.सुहानी प्रतिभानगरमध्ये राहते. तिचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. वडिलांकडून त्यांनी रायडिंगचा बाळकडू घेतला. वडीलही डर्ट ट्रॅकमध्ये नेहमी भाग घेत असल्याने सुहानीलाही याची आवड लागली. यांनीही सन २०१९ पासून डर्ट ट्रॅकच्या स्पर्धेत त्या भाग घेतात.शांभवी या कंदलगाव येथे राहतात. इंटेरिअर डिझायनर म्हणून त्या नोकरी करतात. नोकरी करीत त्या छंद म्हणून रायडिंग करतात. शालेय वयातच त्यांनी दुचाकी शिकली. सन २०१९ पासून डर्ट ट्रॅक आणि रेसिंगच्या स्पर्धेत सहभाग घेतात. चिखलात जिवघेणी वळणे पार करून त्यांनी गोव्याचा डर्ट ट्रॅक यशस्वीपणे पूर्ण करून त्यांनी पदक मिळवले.

स्पर्धेत धोका अधिक पण...डर्ट ट्रॅक, हिल क्लाइंब साहसी स्पर्धा असल्या तरी मुलीही यामध्ये यश मिळवू शकतात. नियमित सराव असेल तर यश मिळते. यामध्ये धोका अधिक असतो, पण थरार अनुभवता येतो. यामध्ये करिअरलाही संधी आहेत, असे शांभवी आणि सुहानी सांगतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur girls shine in dirt track race, making India proud.

Web Summary : Kolhapur's Shambhavi and Suhani excelled in Goa's national dirt track race. Despite the dangers of hill climbs and dirt tracks, these women showcased their riding skills, proving girls are no less capable. They inspire with their passion and success.