शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

यूपीएससी परीक्षेत कोल्हापुरातील दोघा सुपुत्रांचे घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 19:45 IST

शाहुवाडीचे आशिष पाटील तर कागलचे स्वप्निल माने यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले.

कोल्हापूर : यूपीएससी फायनलचा निकाल आज, सोमवारी जाहीर झाला. यानिकालात देशात पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मा देशात पहिली आली आहे. तर, महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. कोल्हापुरातूनही दोघांनी या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. देशात यंदा यूपीएससीमध्ये एकूण ७४९ उमेदवार यशस्वी ठरले आहेत.शाहुवाडीचे आशिष पाटील तर कागलचे स्वप्निल माने यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले. आशिष यांनी ५६३ वी तर स्वप्नील माने यांनी ५७८ वी रँक मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.कागलमधील स्वप्नील माने याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर त्याने गारगोटी येथील आयसीआरई महाविद्यालयातून मेकॅनिकल विभागातून डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात बी टेक पूर्ण केले. बी टेक नंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी करत होता. अन् त्याने देशात ५७८ वी रँक मिळवत यश संपादन केले.तर, शाहुवाडी तालुक्यातील साळशी येथील आशिषने हे यश दुसऱ्याच प्रयत्नात प्राप्त केले आहे. आशिषचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण झाले आहे. माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय बांबवडे येथे पूर्ण झाले. पुढे पुण्यातच अकरावी व बारावी ते इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन मधून इंजिनिरिंग पूर्ण केले. यानंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. अन् त्याने देशात ५६३ वी रँक मिळवत यश संपादन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षा