शाहूवाडी तालुक्यात पावसाने विजेचे खांब कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:24+5:302021-05-17T04:22:24+5:30
सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी सुरू आहेत. येळाणे येथील किरण यादव यांच्या घरावर झाडाची फांदी तुटून ...

शाहूवाडी तालुक्यात पावसाने विजेचे खांब कोसळले
सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी सुरू आहेत. येळाणे येथील किरण यादव यांच्या घरावर झाडाची फांदी तुटून पडली. दैव बलवत्तर म्हणून त्यांची पत्नी वाचली. येळाणे-कोपार्डे-सांबू या परिसरातील लोकवस्ती व वीज वाहिन्या जाणाऱ्या मार्गांवरील धोकादायक फांद्या संबंधित विभागाने तात्काळ तोडाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. मलकापुरातील बाबूराव भोपळे यांच्या घराचा पत्रा उडाला आहे. महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच जागे होऊन धोकादायक फांद्या तोडाव्यात. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे आंबा, विशाळगड, परळे निनाई, उदगीरसह डोंगरकपारींत वसलेल्या वाड्यावस्त्यांचा वीजपुरवठा बंद झाला आहे. आळतूर, चांदोली, कोतोली, ऐनवाडी परिसरातील काही विजेचे खांब कोसळले आहेत, तर काही कोलमडले आहेत. शाहूवाडी तालुक्यातील जीर्ण, गंजलेले विजेचे खांब महावितरणने पाहणी करून तात्काळ बदलणे गरजेचे आहे. काही भागांत शेड व घरांचे पत्रे उडून गेले आहेत. आंबा-विशाळगड मार्गावर वृक्षांच्या फांद्या पडल्या आहेत.
फोटो .
येळाणे, ता. शाहूवाडी येथील किरण यादव यांच्या घरावर पडलेली झाडांची फांदी.