शाहू स्पोर्टस‌् ॲकॅडमीची एसपी क्रिकेटवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:23 IST2021-02-13T04:23:05+5:302021-02-13T04:23:05+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या क गट टी-२० क्रिकेट स्पर्धेत शाहू स्पोर्टस‌् ॲकॅडमीने चंदगडच्या एस.पी. ...

Shahu Sports Academy beats SP Cricket | शाहू स्पोर्टस‌् ॲकॅडमीची एसपी क्रिकेटवर मात

शाहू स्पोर्टस‌् ॲकॅडमीची एसपी क्रिकेटवर मात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या क गट टी-२० क्रिकेट स्पर्धेत शाहू स्पोर्टस‌् ॲकॅडमीने चंदगडच्या एस.पी. क्रिकेट ॲकॅडमीचा ८४ धावांनी पराभव करीत स्पर्धेत आगेकूच केली.

राजाराम काॅलेज मैदानावर शुक्रवारी झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एस.पी. संघाने २० षटकांत ५ बाद १५३ धावा केल्या. यात विवेक बोगाळे याने ६५ चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या. गोलंदाजी करताना शाहू स्पोर्टस‌्कडून अजिंक्य मगदूम याने दोन, अभिजित पाटील व विनायक पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना शाहू स्पोर्टस‌्ने हे आव्हान १९.१ षटकांत ६ बाद १५४ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केला. यात विनायक पाटील याने नाबाद ४९, सागर कुरबेट्टी याने १४, पार्थ चव्हाण याने १२, ओंकार परब याने ११ अजिंक्य मगदूम याने १० धावा केल्या. एस. पी. संघाकडून विशाल कांबळेने दोन, विवेक बोंगाळे व सुनील यतीमकर याने प्रत्येकी एक बळी घेतला. विवेक बोंगाळे याचे नाबाद शतक आणि गोलंदाजी असा अष्टपैलू खेळ संघाला पराभ‌वापासून वाचवू शकला नाही.

.

Web Title: Shahu Sports Academy beats SP Cricket