‘सार्थक’च्या कलाकारांनी जागवली शाहू गाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST2021-06-23T04:17:00+5:302021-06-23T04:17:00+5:30

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्थक आर्ट, सोशल अँड कल्चरल फौंडेशनने ‘राजर्षी शाहू गाथा’ या लघुनाट्याची ...

Shahu saga awakened by the actors of 'Sarthak' | ‘सार्थक’च्या कलाकारांनी जागवली शाहू गाथा

‘सार्थक’च्या कलाकारांनी जागवली शाहू गाथा

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सार्थक आर्ट, सोशल अँड कल्चरल फौंडेशनने ‘राजर्षी शाहू गाथा’ या लघुनाट्याची निर्मिती केली आहे. यात शाहू महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग चित्रित करण्यात आले असून हे नाट्य दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर व सांस्कृतिक मंत्रालय यांच्यावतीने शनिवारी (दि. २६) यू ट्यूब आणि फेसबुकद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे.

या नाट्याचे लेखन युवराज पाटील यांनी, तर दिग्दर्शन स्नेहल संकपाळ यांनी केले आहे. चित्रीकरण शैलेश शिंदे यांचे आहे. हे लघुनाट्य कोल्हापूरच्या कलाकारांनी साकारले आहे. यावेळी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर बगाडे, कोल्हापूर डान्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित पाटील, नृत्य परिषदेचे सचिव रोहित पाटील, सोनाली रजपूत, सुमित साळुंखे, ओंकार शेटे, महेश बगाडे उपस्थित होते.

--

फोटो नं २२०६२०२१-कोल-सार्थक क्रिएशन

ओळ : शाहू जयंतीनिमित्त कोल्हापुरातील सार्थक क्रिएशनच्या वतीने ‘राजर्षी शाहू गाथा’ या लघुनाट्याची निर्मिती करण्यात आली आहे.

--

Web Title: Shahu saga awakened by the actors of 'Sarthak'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.