शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

Shahu Maharaj Jayanti शाहू मिलवरील प्रकल्पाबाबत २0 जुलेनंतर बैठक : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 11:20 IST

राजर्षि शाहू मिलच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत पावसाळी अधिवेशन झाले की २0 जुलैनंतर बैठक घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंगळवारी सकाळी शाहू जन्मस्थळी अभिवादन केल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देजन्मस्थळी शाहू महाराजांना अभिवादनशाहू मिलवरील प्रकल्पाबाबत २0 जुलेनंतर बैठक : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राजर्षि शाहू मिलच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाबाबत पावसाळी अधिवेशन झाले की २0 जुलैनंतर बैठक घेणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंगळवारी सकाळी शाहू जन्मस्थळी अभिवादन केल्यानंतर उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.राजर्षि शाहू महाराजांच्या जयंतीच्यानिमीत्ताने मंत्री पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी यावेळी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. जयसिंगराव पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री म्हणाले, शाहू जन्मस्थळी उत्तम संग्रहालय व्हावे यासाठी १३ कोटी रूपये मंजूर आहेत. त्यातील २ कोटी रूपये खात्यावर जमाही आहेत. मात्र हे काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे. तीन वेळा निविदा काढल्याशिवाय दुसऱ्या पध्दतीने हे काम करता येणे नियमानुसार शक्य नाही. त्यामुळे तीन वेळा निविदा काढल्या. यानंतर अन्य ठेकेदारांकडून निविदा मागणवण्यासाठी परवानगी घेतली. ५ निविदांपैकी २ नाकारण्यात आल्या असून ३ मंजुरीसाठी मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत. ती मंजुरी आली की कामाला सुरूवात होईल.शाहू महाराजांच्या विचाराला धरून सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेताना पाटील म्हणाले, मराठा समाजातील मुलामुलींच्या सर्वांगिण उन्नतीसाठी ‘बार्टी’च्या धर्तीवर संस्था स्थापन करावी अशी मराठा मोर्चाची मागणी होती. ती ‘सारथी’च्या रूपाने पूर्ण होत आहे.

यातून या मुलामुलींना परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यापासून ते समाजाच्या आर्थिक, सांस्कृतिक स्थितीचाही अभ्यास होणार आहे. महाराजांच्या नावे शिष्यवृत्तीही सुरू असून त्यातील ५0 टक्के रक्कम शासन भरणार आहे. शाहू समाधीस्थळालाही गती देण्याची त्यांनी सुचना केली.शाहू मिलच्या जागी केवळ स्मारक होण्यापेक्षा ज्या हेतूने मिलची स्थापना झाली होती तोच हेतू ठेवून महिला गारमेंट पार्क उभारण्याचे नियोजन असून दिल्लीतून वस्त्रोद्योग विभागाकडील प्रस्तावाची स्थिती आपण पाहू आणि या कामाला देखील गती देवू अशी ग्वाही दिली.

यावेळी उपमहापौर महेश सावंत, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Shahu Maharaj Jayantiशाहू महाराज जयंतीChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर