न्याय दिन व राजर्षी शाहू जयंती

By admin | Published: June 28, 2014 11:39 PM2014-06-28T23:39:40+5:302014-06-28T23:39:40+5:30

दलितांचे कैवारी, अस्पृश्योधारक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व प्राथमिक शिक्षण संचलनालय यांच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी

Justice Day and Rajarshi Shahu Jayanti | न्याय दिन व राजर्षी शाहू जयंती

न्याय दिन व राजर्षी शाहू जयंती

Next

गोंदिया : दलितांचे कैवारी, अस्पृश्योधारक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व प्राथमिक शिक्षण संचलनालय यांच्या परिपत्रकानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक न्याय दिन व शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
सालेकसा : पंचायत समिती सालेकसा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनसुवाबोरी येथे छत्रपती शाहू महराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम सरपंच पूजा वरखडे यांच्या अध्यक्षतेत ‘गावची शाळा-आमची शाळा’ या उपक्रमांतर्गत घेण्यात आला. यावेळी सतीश उईके, हेमन भलावी, उपसरपंच प्यारेलाल वरखडे, रमनदास बैठवार, पवन ठकरेले उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थित पाहुण्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक बोरकर यांनी केले. आभार प्रदर्शन अनिता बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिल्हारे, रुपाली भलावी, रुपेश भलावी, विजय दशरीया, जितेंद्र पशरीया, बालू धामडे यांनी सहकार्य केले.
सालेकसा : स्थानिक मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालयात इतिहास अभ्यास मंडळाच्यावतीने एच.बी. चौरसिया यांच्या मार्गदर्शनात डॉ. गोपाल हलमारे यांच्या अध्यक्षतेत नुकतीच छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भगवान साखरे, डॉ. उमावती पवार, डॉ. एन.एम. हटवार, प्रा. ममता पालेवार उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रात केलेल्या सामाजिक सुधारणांची माहिती दिली व त्यांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अश्विन खांडेकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.बी.टी. फुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बी.के. जैन, प्रा. परिमल डोंगरे, ग्रंथपाल अरविंद भगत, नामदेव बागडे, रमेश चुटे, प्रकाश गायधने यांनी सहकार्य केले.
देवरी : आदर्श शिक्षण संस्थेतर्फे संचालित स्थानिक मनोहरभाई पटेल कनिष्ठ व विज्ञान, कला कनिष्ठ माहविद्यालय देवरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य पारबता चांदेवार उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संतोष मडावी, उपसभापती लक्ष्मण सोनसर्वे, जि.प. सदस्य राजेश चांदेवार, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष यशवंत गुरुनुले, संताष अग्रवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य के.सी. शहारे, के.सी. गोंडाणे, पर्यवेक्षक एस.टी. हलमारे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. जी.एम. मेश्राम यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक के.बी. गोंडाणे यांनी मानले.
अर्जुनी/मोरगाव : येथील सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोककल्याणकारी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना १४० व्या जयंती निमित्त आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल मंत्री होते. याप्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका वीणा नानोटी, सांस्कृतिक विभाग प्रमुख के.के . लोथे, मूल्यशिक्षण प्रमुख संजय बंगळे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बंगळे व नंदा लाडसे यांनी शाहू महाराजांविषयी तर लोथे यांनी अमली पदार्थ सेवन विरोधी दिनाविषयी माहिती विषद केली. अमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधुन अमली पदार्थाचे भविष्यात कधीही सेवन करणार नाही अशी शपथ घेऊन विद्यार्थ्यांनी संकल्प केला. कार्यक्रमाचे संचालन करून आभार लोथे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना गुरनुले, रुपराम धकाते, खुशाल शहारे, प्रा. चंद्रनील काशीवार, महेश पालीवाल व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.
सडक/अर्जुनी : नवजीवन विद्यालय राका येथे राजर्षी शाहु महाराज यांची जयंती तसेच पुस्तक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्था अध्यक्ष यशवंत दुनेदार, ग्रा.प. सदस्य प्रमोद मेंढे, सदस्य नामदेव चाकाटे, कैलास रामटेके व अन्य उपस्थित होते.

Web Title: Justice Day and Rajarshi Shahu Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.