शाहू कृषी संघाची निवडणूक तिसऱ्यांदा बिनविरोध.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:11 IST2021-01-24T04:11:15+5:302021-01-24T04:11:15+5:30
बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे ...

शाहू कृषी संघाची निवडणूक तिसऱ्यांदा बिनविरोध.
बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी .पाटील, सचिव समीर नाळे प्रमुख उपस्थित होते. बिनविरोध निवड झालेले संचालक असेः समरजितसिंह घाटगे ( कागल ), रामचंद्र खराडे (शिंदेवाडी), पंकज पाटील (कोगनोळी ), अरुण शिंत्रे ( सोनगे ), अनंत फर्नांडिस (मुरगूड), रामचंद्र वैराट (एकोंडी), मोहन शेटके (बाळेघोल), प्रशांत घोरपडे ( खडकेवाडा ), भीमगोंडा पाटील (सुळकूड), आनंदा पाटील (बोळावी), बाळकृष्ण काईंगडे (नानीबाई चिखली), दिनकर वाडकर (व्हनाळी), भाऊसाहेब कांबळे ( केंबळी), मालूबाई पाटील (बेलवळे), जयश्री कोरवी ( कागल). या निवडीनंतर शाहू साखर कारखान्याच्या प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज व शाहू ग्रूपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
फोटो पंधरा संचालकांचे पाठवित आहे.