कागलमध्ये शाहू जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST2021-06-27T04:16:12+5:302021-06-27T04:16:12+5:30

येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील शाहू उद्यानात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. ...

In Shahu Jayanti excitement in Kagal | कागलमध्ये शाहू जयंती उत्साहात

कागलमध्ये शाहू जयंती उत्साहात

येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील शाहू उद्यानात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा बॅंकेचे संचालक भय्या माने यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले. यावेळी उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, नगरसेवक विवेक लोटे, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, गणेश कांबळे, संजय चितारी आदी उपस्थित होते.

श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत जयसिंगराव घाटगे यांच्या प्रधान कार्यालयातील प्रतिमेचे व स्व. विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक बाॅबी माने, युवराज पाटील, सचिन मगदूम, युवराज पसारे, नंदकुमार माळकर उपस्थित होते.

छायाचित्र -

कागल येथे शाहू कारखाना कार्यस्थळावर शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास समरजित़सिंह घाटगे, नवोदिता घाटगे, वीरकुमार पाटील व इतर मान्यवरांनी अभिवादन केले.

Web Title: In Shahu Jayanti excitement in Kagal