वारणानगर परिसरात शाहू जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:19+5:302021-06-27T04:17:19+5:30

वारणानगर : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रतिमापूजन, ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करून अभिवादन करण्यात ...

Shahu Jayanti celebrations in Varanasi area | वारणानगर परिसरात शाहू जयंती उत्साहात

वारणानगर परिसरात शाहू जयंती उत्साहात

वारणानगर : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रतिमापूजन, ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले. कोल्हापूर येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील इतिहासाचे संशोधक अभ्यासक डॉ. सुरेश शिखरे प्रमुख पाहुणे, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर यांच्या हस्ते महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एस. एस. खोत यांनी स्वागत, तर प्रास्ताविक संयोजक प्रा. उमेश जांभोरे यांनी केले. कैलास मदने यांनी आभार मानले.

२६ वारणानगर शाहू जयंती

फोटो ओळी - वारणानगर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Shahu Jayanti celebrations in Varanasi area