भोगावती कारखान्याच्या वतीने शाहू जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:17 IST2021-06-27T04:17:18+5:302021-06-27T04:17:18+5:30

परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. कारखाना कार्यस्थळावरील शाहू ...

Shahu Jayanti celebration on behalf of Bhogawati factory | भोगावती कारखान्याच्या वतीने शाहू जयंती साजरी

भोगावती कारखान्याच्या वतीने शाहू जयंती साजरी

परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.

कारखाना कार्यस्थळावरील शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर व ज्येष्ठ संचालक कृष्णराव किरूळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखाना कार्यस्थळावर वृक्षारोपणही करण्यात आले. या कार्यक्रमाला संचालक हिंदुराव चौगले, विश्वनाथ पाटील, मारुतराव जाधव, धीरज डोंगळे, प्रा. शिवाजीराव पाटील, बळवंत पाटील, प्रा. सुनील खराडे, मोहन डवरी, रवींद्र पाटील, जयवंतराव कांबळे, शिवाजीराव कारंडे,कामगार प्रतिनिधी संभाजी चौगले, शिवाजी डोंगळे, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी :

भोगावती येथे राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करताना उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, कृष्णराव किरूळकर व संचालक मंडळ.

Web Title: Shahu Jayanti celebration on behalf of Bhogawati factory