शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विशाळगडावरील हिंसाचाराच्या घटनेने शाहू छत्रपती गलबलले, हिंसाचारग्रस्तांना आधार देण्यासाठी घेतला पुढाकार 

By भारत चव्हाण | Updated: July 17, 2024 13:00 IST

भारत चव्हाण कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने उभारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने खासदार शाहू ...

भारत चव्हाण

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मागणीसाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने उभारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने खासदार शाहू छत्रपती गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड अस्वस्थ असल्याचे पहायला मिळाले. दंगलीचे वृत्त कळताच मुंबईला जात असलेले शाहू छत्रपती पुण्यातून कोल्हापूरला परतले आणि प्रत्येक घटनेवर त्यांनी लक्ष ठेवत हिंसाचारग्रस्तांना मानसिक आधार देण्यासाठी पुढाकार घेतला. मंगळवारी त्यांनी गजापूर येथे जाऊन नागरिकांशी संवाद साधत एक मुलीच्या अंगावर स्वत:चे जॅकेटही घातले. या कृतीतून त्यांच्या हळव्या मनाची प्रचिती आली.विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलन पुकारल्यानंतर शाहू छत्रपती यांची भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी संयमाने घ्यावे, अशीच होती. हिंसाचार घडण्यापूर्वी पाच दिवस आधी शाहू छत्रपती यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना फोन केला. ‘या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्या. समाजमाध्यमावरून आवाहन केले जात आहे. काही तरी वेगळे घडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधितांशी चर्चा करा, माझी आवश्यकता असेल तर मलाही बोलवा’, अशी सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संभाजीराजे यांच्याशी फोनवर संपर्क करून चर्चेला येण्याचे आवाहन केले. पण, संभाजीराजे यांनी ते ऐकले नाही. शेवटी जिल्हाधिकारी येडगे न्यू पॅलेसवर गेले. त्यांनी तुम्हीच संभाजीराजेंना समजवा, असे सांगितले. परंतु, संभाजीराजे तेथे नव्हते. म्हणून शाहू छत्रपतींनी संभाजीराजेंशी फोनवर चर्चा केली. दीड वर्षे मी मागणी करतोय कोणीच काही करत नाही, मला कोणी तरी शब्द द्यावा, असे संभाजीराजे सांगत होते. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचा विषय झाला, परंतु पुढे काही झाले नाही.मुकेश अंबानी यांच्या पुत्राच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी रविवारी सकाळी शाहू छत्रपती मुंबईला जात होते. परंतु, वाटेत त्यांना विशाळगड हिंसाचाराची बातमी समजली. त्यावेळी त्यांनी पुण्यातूनच मागे फिरण्याचा निर्णय घेतला. रविवारी सायंकाळी ते पॅलेसवर पोहोचले. त्यांनी सर्व माहिती घेतली, काही व्हिडीओ पाहिले तेव्हापासून शाहू छत्रपती अस्वस्थ झाले. जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरुन परिस्थितीची माहिती करून घेतली.सोमवारी सकाळी त्यांनी सर्वप्रथम या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आणि विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, काही सहकाऱ्यांनी त्यांना परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून, उद्या जाऊया, असे सांगून थांबविले. मनात प्रचंड घालमेल सुरू असल्याने त्यांनी रविवारी दुपारचे जेवणही घेतले नाही. त्यांच्या सोबत असणाऱ्या मालोजीराजे, मधुरिमाराजे, व्ही. बी. पाटील यांनी त्यांना काही तरी खाण्याचा आग्रह धरला. त्यावेळी त्यांनी हलकासा नाष्टा घेतला. सायंकाळी इंडिया आघाडीची बैठक बोलाविली.मंगळवारी त्यांनी विशाळगडावर जात असताना सोबत अन्नधान्य घेऊन गेले. महिला, पुरुष यांच्याशी जवळून संवाद साधत त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग जाणून घेतला. हा दुर्दैवी प्रसंग त्या कुटुंबावर नाही तर आपल्या स्वत:वरच ओढवलेला आहे, अशा विषन्न मनाने ते महिलांचे म्हणणे जाणून घेत होते. सगळा प्रकार ऐकून शाहू छत्रपती गलबलून गेले. या घटनेला आपल्या घरातील एका सदस्याच्या आंदोलनामुळे हे घडले याचे अतीव दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. पण, सर्व समाज आपला आहे, त्यांचे दु:ख हे आपले आहे, असे समजून त्यांनी हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती