शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'कोल्हापूर'साठी काँग्रेसकडून शाहू छत्रपती उमेदवार निश्चित, आज घोषणा शक्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 13:44 IST

'महाविकास'च्या बैठकीत 'ठरलं'

कोल्हापूर : काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दोघांनाही हवा असलेला कोल्हापूरलोकसभा मतदारसंघ काँग्रेसला देत तेथून शाहू छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचा निर्णय मंगळवारी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज बुधवारी होणाऱ्या महाविकासच्या बैठकीत शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याचे समजते.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. मात्र, बदलत्या राजकीय समीकरणात शिवसेनेची शकले झाल्यानंतर या मतदारसंघावर दावा सांगत काँग्रेसने शाहू छत्रपती यांना मैदानात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, आपला पारंपरिक मतदारसंघ सहजासहजी काँग्रेसला सोडायला शिवसेना तयार नव्हती. या एकाच जागेवरून गेल्या आठवड्यापासून दोन्ही पक्षांत अंतर्गत जोरदार घमासान सुरू असताना सोमवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झाली. यात प्रामुख्याने कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा झाली. या बैठकीत कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्याबाबत शिवसेनेने सहमती दर्शविली असल्याचे कळते. याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे.

दोन नव्हे, एकच जागाकोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ पूर्वी भाजप- शिवसेना युतीत सेनेकडे होते. भाजपपासून काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही मतदारसंघ लढविण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, शिवसेनेने यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ माजी खासदार राजू शेट्टी यांना सोडत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरचा दावा अधिक घट्ट केला होता. या जागेवर काँग्रेसने दावा ठोकताच पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा लढवायला आमच्याकडे एकही जागा उरत नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे होते.मात्र, हातकणंगलेची जागा शिवसेनेची आहे. त्यांच्या कोट्यातून त्यांनी ती राजू शेट्टी यांना दिल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी निदर्शनास आणून दिले. हातकणंगलेची जागा शिवसेनेकडे आहे, हवे तर त्यांनी ती लढवावी, असे सुचवत कोल्हापूरच्या दोन्ही जागा आमच्याकडे नाहीत, असे शिवसेना कशी काय म्हणू शकते? अशी मांडणी काँग्रेसने केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणlok sabhaलोकसभाShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेस