‘शाहू कार्निव्हल’ची जल्लोषात सांगता

By Admin | Updated: December 15, 2014 00:12 IST2014-12-15T00:08:58+5:302014-12-15T00:12:56+5:30

आवाज.... गौरवचा

'Shahu Carnival' celebrates the celebration | ‘शाहू कार्निव्हल’ची जल्लोषात सांगता

‘शाहू कार्निव्हल’ची जल्लोषात सांगता

कोल्हापूर : फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मास्टर शेफ, प्रश्नमंजुषा, फेस पेंटिंग आणि त्यानंतर तरुणाईचा जल्लोषात शाहू विद्यालयातर्फे आयोजित कार्निव्हलची सांगता झाली. न्यू पॅलेस परिसरातील छत्रपती शाहू विद्यालयात आज, रविवारीही दुसऱ्या दिवशीही विविध कलाविष्कारांनी ‘कार्निव्हल २०१५’मध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थितांवर छाप पाडली.
सकाळी फेस पेटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा, विविध प्राणी, स्त्री भ्रूणहत्या, स्पायडर मॅनसह विविध भुतांच्या रूपातील चित्रे आपल्या चेहऱ्यावर काढली होती. मास्टर शेफ स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ बनवून ‘हम भीं
किसी से कम नहीं’ हे सिद्ध करून दाखविले. गाण्यांच्या कार्यक्रमात एकापेक्षा एक सरस गाणी गात तेरा इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी सहभाग घेतला होता. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.


आवाज.... गौरवचा
छत्रपती शाहू विद्यालयातील ‘कार्निव्हल २०१४’ मध्ये आज गायन स्पर्धेत महावीर इंग्लिश स्कूलच्या गौरव माळीने आपल्या बहारदार गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. अनेकांनी त्याच्या गाण्यांना ‘वन्स मोर’देत त्यांच्या गायकीला दाद दिली. या कार्निव्हलमध्ये गौरवचा आवाज घुमत होता.


कोल्हापुरातील छत्रपती शाहू विद्यालयातील ‘कार्निव्हल २०१४’ मध्ये रविवारी झालेल्या स्पर्धेत गीत सादर करताना गौरव माळी, तर दुसऱ्या छायाचित्रात चेहरे रंगवा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे चित्रे काढली.

Web Title: 'Shahu Carnival' celebrates the celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.