शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना मोफत रक्तपुरवठा करणार, शाहू ब्लड बँकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 19:29 IST

रक्तातील पीसीव्ही, एफएफपी व आरडीपी या घटकांच्या रक्त पिशवीची किंमत प्रत्येकी १५०० रुपये आहे.

कोल्हापूर : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूरातील सामान्य जनता धावून आली असताना आता त्यांना मोफत रक्तपुरवठा करण्यासाठी येथील शाहू ब्लड बँक ही पुढे सरसावली आहे. परंतू त्यासाठी तरुणाईने रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन मंगळवारी येथे बँकेच्या पदाधिका-यांनी केले. महापुरानंतर मुख्यत: डेंग्यू, लेप्टोप्लायरेसीचे रुग्ण वाढू शकतात व त्या रुग्णांना रक्ताची गरज भासते हे लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिली.

रक्तातील पीसीव्ही, एफएफपी व आरडीपी या घटकांच्या रक्त पिशवीची किंमत प्रत्येकी १५०० रुपये आहे. रक्तावरील प्रक्रिया खर्चच ७०० रुपये असून तो ब्लड बँक स्वत: सोसणार आहे. हे रक्त मोफत पुरविले जाणार आहे. फक्त त्यासाठी संबंधित डॉक्टर्सनी रुग्ण पूरग्रस्त आहे असे पत्र देण्याची आवश्यकता आहे. ही सेवा ब्लड बँकेत २४ तास सुरु राहील.

मोफत रक्तपुरवठा करायचा असेल तर त्यासाठी रक्तसंकलनही होणे आवश्यक आहे. म्हणून गुरुवार १५ आॅगस्टपासून चंदूकाका सराफ दुकानाच्या मागील बाजूस रक्तदान शिबीरांचे सकाळी ११ ते ५ या वेळेत आयोजन केले आहे. कुणी मंडळांने पुढाकार घेतला तर तिथे जावून रक्तदान शिबीर घेतले जाईल. कोल्हापूरातील लोक जसे मदतीसाठी धावून आले तसेच रक्तदानासाठी पुढे आले तरच पूरग्रस्तांना मोफत रक्तपुरवठा करता येईल. त्यामुळे गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था-संघटना,कार्यकर्ते यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.

अधिक माहितीसाठी प्रशासन अधिकारी अमर पाटील (मो-९३७०५०३०२१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षता पवार, शेतकरी संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील भुयेकर, मानसिंगराव जाधव, ब्लड बँकेचे सचिव बाबाभाई वसा, संचालक राजू दोशी, राजेंद्र देशिंगे, महेंद्र परमार आदी उपस्थित होते.एसडीपी रक्त सवलतीतसिंगल डोनर प्लेटलेटस (एसडीपी) रक्ताच्या पिशवीची किंमत ११ हजार रुपये आहे. या रक्तावरील प्रक्रिया खर्चच ८ हजार रुपये आहे. त्यामुळे हे रक्त मोफत दिले जाणार नाही. त्यावर दहा टक्के सवलत दिली जाणार आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरfloodपूर