शहीद जवानाचे कुटुंबीय अद्याप धक्क्यातच
By Admin | Updated: May 22, 2014 01:09 IST2014-05-22T01:04:32+5:302014-05-22T01:09:44+5:30
कुटुंबीय अद्यापही धक्क्यातून नाही सावरलेले

शहीद जवानाचे कुटुंबीय अद्याप धक्क्यातच
नेसरी : हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील शहीद जवान उत्तम बाळू भिकले यांचे कुटुंबीय अद्यापही धक्क्यातून सावरलेले नाही. पुत्राची शहीद झालेली बातमी ऐकल्यापासून ते आतापर्यंत संपूर्ण कुटुंब शरिराने व मनाने खचल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संवेदनशील भिकले कुटुंबीयांना केवळ उत्तम जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, वृत्तपत्रामधून मुलगा शहीद झाल्याचे समजताच संपूर्ण कुटुंबच दु:खाच्या खाईत लोटले आहे. आई-वडील, पत्नी, भाऊ, बहीण यांच्या सांत्वनासाठी येणार्यांची संख्या वाढत असून सर्वांची प्रकृती बिघडली आहे. दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जे. एस. नेवडे, डॉ. राधिका साळुंखे, डॉ. एस. बी. शिंदे, डॉ. अझहर नूलकर, डॉ. मंगल सूर्यवंशी, डॉ. सत्यजित देसाई हे संपूर्ण कुटुंबीयांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत. आई लीलाबाई व बहीण कविता यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली आहे. पत्नी सुगंधा व भावजय सुषमा यांना मानसिक धक्का बसल्याचे डॉ. जे. एस. नेवडे यांनी सांगितले. (वार्ताहर)