शहा विद्यामंदिर शाळेची घंटा वाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST2020-12-05T04:54:53+5:302020-12-05T04:54:53+5:30
कोरोनामुळे शाळा साधारण आठ महिने बंद होती; पण दीर्घ सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळा व्यवस्थापनाने ...

शहा विद्यामंदिर शाळेची घंटा वाजली
कोरोनामुळे शाळा साधारण आठ महिने बंद होती; पण दीर्घ सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शाळा व्यवस्थापनाने सुरक्षेबाबत आवश्यक सर्व खबरदारी घेतल्याने पालकांनीदेखील समाधान व्यक्त केले. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ क्रीडांगणावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. शाळा परिसरात सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे. शासन नियमानुसार ज्या पालकांचे संमतीपत्र आहे अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला असून, शाळेचे अध्यापनाचे काम व्यवस्थित झाल्याचे चित्र होते.
यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व सेवक नियमांचे पालन करून दक्षता घेतली.
- शासन नियमांचे पालन करून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपयोजना केल्या आहेत व शालेय कामकाज सुरू केले आहे.
-गोमटेश बेडगे, मुख्याध्यापक, एम. जी. शहा विद्यमंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली