शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सावली रविवारी  ५२ सेकंद गायब होणार, कोल्हापूरातून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 17:13 IST

असं म्हटल जात की आपली सावली कधी आपली साथ सोडत नाही. रविवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे आणि ४ सेकंद या कालावधीत मात्र, सावली आपली साथ ५२ सेकंदांपर्यंत सोडणार आहे.

ठळक मुद्देसावली रविवारी  ५२ सेकंद गायब होणार, कोल्हापूरातून सुरुवात‘झिरो शॅडो ’अर्थात शून्य सावली दिवस अनुभव घेता येणार

कोल्हापूर : असं म्हटल जात की आपली सावली कधी आपली साथ सोडत नाही. रविवारी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे आणि ४ सेकंद या कालावधीत मात्र, सावली आपली साथ ५२ सेकंदांपर्यंत सोडणार आहे. ही खगोल शास्त्रामधील ही अद्भूत घटना ‘झिरो् शॅडो डे’ अर्थात शून्य सावली दिवसानिमित्त आपणा सर्वांना हा अनूभव घेता येणार आहे.कर्क वृत्त आणि मकर वृत्त या दोन वृत्तांमध्ये राहणाऱ्या लोकांना वर्षातून दोन वेळेला हा शू्न्य सावलीचा अनुभव घेता येतो. कर्क वृत्त , मकर वृत्त आणि विषूववृत्त या वृत्तावरती रहाणाऱ्या लोकांना वर्षातून एकदाच शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. मात्र, कर्कवृत्ताच्या वरच्या भागात राहणाऱ्या व मकर वृत्ताच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांना मात्र, या शून्य सावलीचा आनंद घेता येत नाही.

आपली पृथ्वी ज्या अक्षाभोवती फिरते त्याला २३.५ डीग्री एवढा कल आहे. पृथ्वीच्या सुर्याभोवती फिरण्याच्या मार्गाला आमनीक वृत्त असे म्हणतात. पृथ्वी ही कर्कवृत्तावरुन बरोबरी ३ महिन्यांनी वसंत संचात बिंदूपाशी येते. या दिवशी १२ तासांची रात्र आणि १२ तासांचा दिवस असतो.

या दिवशी सुर्याची किरणे विषुववृत्तावरती वरुन पडतात.त्यामुळे विषूववृत्तावरती कुठेही आपण उभारलो तरी काही काळासाठी आपली सावली गायब होत असते. यानंतर बरोबरी तीन महिन्यानंतर मकर वृत्तावरती त्याच्या ३ महिन्यांनी परत विषुववृत्तावर आणि नंतर पुन्हा तीन महिन्यानंतर कर्क वृत्तावरती शुन्य सावलीचा आनंद घेता येणार आहे.सुरुवात कोल्हापूरातूनपृथ्वी जसजशी फिरत जाईल तसतसे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्यापासून निरनिराळ्या दिवशी ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. याची सुरुवात कोल्हापूरातून रविवारपासून होईल.कर्कवृत्त व विषुववृत्त या दोन स्थानांच्या मध्ये सुर्याची किरणे ही ज्यावेळी १६.७४ डीग्री उत्तर या रेखांवृत्तावरती पडतील. त्यावेळी या ठिकाणी असणाऱ्या सर्व जागांवर काही सेकंदांपर्यंत शून्य सावलीचा आनंद घेता येणार आहे. त्यात आपलं कोल्हापूर त्यापैकी एक ठिकाण आहे. 

रविवारी (दि. ६) रोजी १२ वाजून २९ मिनिटे ११ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे ४ सेकंदांपर्यंत कोल्हापूरकरांना ५२ सेकंदांपर्यंत शून्य सावलीचा अद्भूत चमत्कार अनुभवता येणार आहे.- डॉ. मिलिंद कारंजकर, पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख, विवेकानंद कॉलेज 

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषkolhapurकोल्हापूर