शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘शेकाप’चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, जाब विचारु : संपतराव पवार-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 16:52 IST

कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या मारण्यात आला.

ठळक मुद्देकर्जमाफीवरुन फसवणूक करणारे हे सरकार नादान : संपतराव पवार-पाटील विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने, आंदोलकांनी मारला ठिय्या

कोल्हापूर : कर्जमाफीवरुन धुळफेक करुन शेतकऱ्यांना फसवणारे हे सरकार नादान आहे. येणाऱ्या काळात त्यांना जाब विचारु असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मंगळवारी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करा, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून ठिय्या मारण्यात आला.

दुपारी एकच्या सुमारास टेंबे रोडवरील ‘शेकाप’ कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. ‘कष्टाचा राजा शेतकरी...त्याला करु नका भिकारी’, ‘नको आम्हाला डिजिटलयाझेशन...आम्हाला हवा शेतकरीलायझेशन’, ‘आम्ही लाभार्थी...गॅस-वीज दरवाढीचे आणि लोड शेडींगचे’ अशा आशयाचे फलक लक्ष वेधत होते. घोषणाबाजी करत हा मोर्चा बिंदू चौक, शिवाजी चौक, महापालिका, आईसाहेब महाराज पुतळा, लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार निदर्शने करत आंदोलकांनी ठिय्या मारला.यावेळी संपतराव पवार-पाटील म्हणाले, कर्जमाफीबाबत सरकारने घोषणाबाजी करून गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या फसव्या कर्जमाफीचा काही लाभ होत नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.

याचबरोबर शेतमालाच्या खरेदीसाठी शासनाने उभारलेली तुटपुंजी खरेदी केंद्रे ही व्यापाऱ्यांची बटीक असल्याचे दिसत आहेत. शेतीपंप वीजधारकांच्या वीजदरात सातत्याने सरकार वाढ करीत आहे. शेतकरी कुटुंबातील पती-पत्नी यांना ६० वर्षानंतर महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, ही मागणीही धूळ खात पडली आहे.आंदोलनात अशोकराव पवार-पाटील, भारत पाटील, केरबा पाटील, बाबासाहेब देवकर, दत्तात्रय पाटील, जनार्दन जाधव, बाबूराव कदम, अमित कांबळे, शिवाजी साळुंखे, अंबाजी पाटील, वसंत कांबळे, सुभाष झेंडे, चंद्रकांत बागडी, अजित देसाई, एकनाथ पाटील, राजू देशमाने, शाहीर रंगराव पाटील, मधुकर हरेल, संतराम पाटील आदींचा सहभाग होता. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollectorतहसीलदारFarmerशेतकरी