शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कोल्हापुरातील ग्रामसेवकासह सात जणांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 12:05 IST

शेतजमिनीच्या वादातून कोतोली (ता. पन्हाळा) येथे लोखंडी गज, फावडे, काठ्यांनी सहा जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.

कोल्हापूर : शेतजमिनीच्या वादातून कोतोली (ता. पन्हाळा) येथे लोखंडी गज, फावडे, काठ्यांनी प्राणघातक हल्ला करून सहा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग-२) बी. डी. शेळके यांनी एका महिलेसह एकाच कुटुंबातील सात जणांना दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी अभियोक्ता ॲड. मंजूषा बी. पाटील यांनी काम पाहिले. सुनावणीकडे तालुक्याचे लक्ष होते.शिक्षा झालेल्या आरोपींची नावे अशी : सुरेश संजय पाटील (वय ३३), भाऊ सागर पाटील (३६), वडील संजय केरबा पाटील (६१), अजित वसंत पाटील (२९), भाऊ विनायक पाटील (२६), वडील वसंत केरबा पाटील (५१), आई नकुशा उर्फ लक्ष्मी वसंत पाटील (४६ सर्व रा. कोतोली, ता. पन्हाळा).खटल्याची पार्श्वभूमी अशी की, कोतोली येथे शेतजमिनीच्या कारणांवरून वसंत व केरबा पाटील या भावांचा गावातीलच नीलेश पाटील यांच्याशी पूर्ववैमनस्यातनू वाद होता. दोन्हीही बाजूंनी यापूर्वी पन्हाळा पोलिसात तक्रारी दाखल आहेत. दि. १० मे २०१४ रोजी नीलेश हे घरी होते. त्यावेळी आशिष साखरे याने येऊन त्यांचे काका बाजीराव पाटील यांना मारहाण करत असल्याचे सांगितले.नीलेश कुटुंबासह घटनास्थळी गेले. त्यावेळी हल्लेखोरांनी सहा जणांना लोखंडी गज, फावडे, काठ्यांनी मारहाण केली. हल्ल्यात नीलेश जयसिंग पाटील, सुनीता जयसिंग पाटील, युवराज सर्जेराव पाटील, हौसाबाई सर्जेराव पाटील, बाजीराव श्रीपती पाटील, लक्ष्मी बाजीराव पाटील हे जखमी झाले. ठार मारण्यासाठी आरोपींनी हल्ला केल्याची तक्रार नीलेशनी पन्हाळा पोलिसांत दिली.खटल्यात सरकारी पक्षातर्फे १७ साक्षीदार तपासले. फिर्यादी नीलेश, युवराज, लक्ष्मी पाटील तसेच सीपीआरसह खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. पुरावा व सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजाराचा दंड, दंड न भरल्यास सहा महिने जादा कैद शिक्षा सुनावली. प्रकरणाचा तपास पो.नि. यशवंत गवारे यांनी केला. पैरवी अधिकारी श्याम बुचडे तसेच शहाजी पाटील यांची मदत लाभली.हत्यार जप्ती पंच फितूरखटल्यात हत्यार जप्ती पंच व आशिष साखरे हे फितूर झाले. तरीही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.आरोपी गोंडोलीचे ग्रामसेवकशिक्षा झालेल्यांपैकी सुरेश पाटील हे गोंडोली (ता. शाहुवाडी) येथे ग्रामसेवक म्हणून सेवेत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी