तहसीलदारसह सहाजणांना हद्दपार करणार
By Admin | Updated: July 31, 2015 01:04 IST2015-07-31T01:04:36+5:302015-07-31T01:04:36+5:30
पोलिसांनी पाठविल्या नोटिसा : नऊ आॅगस्टला सुनावणी होणार

तहसीलदारसह सहाजणांना हद्दपार करणार
कोल्हापूर : गुंड स्वप्निल तहसीलदारसह सहाजणांना शाहूपुरी पोलिसांनी हद्दपारीच्या चारवेळा नोटिसा पाठविल्या, पण त्यांनी
नोटिसा न स्वीकारल्याने या सर्वांना अंतिम जाहीर नोटीस शाहूपुरी पोलिसांनी पाठविल्या आहेत. त्यावर ९ आॅगस्ट २०१५ ला सुनावणी होणार आहे.
यामध्ये स्वप्निल तहसीलदार व विठ्ठल काशीनाथ सुतार (रा. विक्रमनगर तिसरी गल्ली, कोल्हापूर), संजय ऊर्फ माया महावीर किरणगे (रा. विक्रमनगर, तिसरी गल्ली, कोल्हापूर, मूळ राहणार ३२ वर्णे हाऊस, जाई-जुई बंगला, सोलापूर), तुषार शिवाजी डवरी (रा. विक्रमनगर, तिसरी गल्ली), राकेश किरण कारंडे (१७९ /२३ शास्त्रीनगर, कोल्हापूर), रामचंद्र विलास (पांडुरंग) सावरे (रा. गणेशनगर, शिंगणापूर रोड) अशी नोटिसा पाठविलेल्या गुंडांची नावे आहेत.
एस. टी. गँगच्या कारवाईसंदर्भात शाहूपुरी पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. शर्मा यांनी या प्रस्तावावर सही केली. गडहिंग्लज विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्याकडे हे काम दिले.
यापूर्वी पाटील यांनी या सर्वांना चारवेळा हद्दपारीच्या नोटिसा पाठविल्या पण,त्यांनी या नोटिसी स्वीकारल्या नाही. त्यामुळे या सर्वांची अंतिम सुनावणी नऊ आॅगस्ट २०१५ ला पाटील यांच्यासमोर होणार आहेत. या सर्वांवर मुंबई पोलीस कायदा ‘कलम १५१’ चे कलम ५५ प्रमाणे हद्दपारीच्या नोटिसा काढण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)