वेश्यांसह सातजणांना अटक
By Admin | Updated: June 29, 2014 00:49 IST2014-06-29T00:44:41+5:302014-06-29T00:49:38+5:30
लक्ष्मीपुरीत हॉटेलवर छापा : हुपरीतील दोघा चांदी व्यापाऱ्यांचा समावेश

वेश्यांसह सातजणांना अटक
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेल सचिन एक्झिक्युटिव्हमध्ये आज, शनिवारी रात्री आठच्या सुमारास लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकून गिऱ्हाईक असलेल्या हुपरीच्या दोघा चांदी व्यापाऱ्यांसह हॉटेल मॅनेजर, एजंट, कामगार अशा सात जणांना अटक केली, तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.
लक्ष्मीपुरीतील हॉटेल सचिन एक्झिक्युटिव्हमध्ये मॅनेजर नितीन गायकवाड व त्याच्या साथीदारांच्या मदतीने हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना मिळाली होती. त्यांनी आज बनावट ग्राहक पाठवून खात्री केल्यावर वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समजले. त्यानुसार छापा टाकून सातजणांना अटक केली, तर एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेतले. याठिकाणी मुंबईच्या एजंटाकडून कोलकात्यातील २० ते २४ वर्षांच्या दोन तरुणी वेश्या व्यवसायासाठी पाठविल्या होत्या. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली. गेल्या एक वर्षापासून या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असून, मुंबईच्या एजंटालाही अटक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)