मनमानी कारभाराविरोधात सांगाव सात सदस्यांचे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:34+5:302021-09-17T04:29:34+5:30

चार वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी एकत्रित आघाडी करत निवडणूक जिंकली ...

Seven members resign against arbitrary rule | मनमानी कारभाराविरोधात सांगाव सात सदस्यांचे राजीनामे

मनमानी कारभाराविरोधात सांगाव सात सदस्यांचे राजीनामे

चार वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी एकत्रित आघाडी करत निवडणूक जिंकली होती. लोकनियुक्त सरपंच रणजित कांबळे यांच्यासह मुश्रीफ गटाचे आठ, मंडलिक गटाचे चार असे बहुमत असल्याने विक्रमसिंह जाधव उपसरपंच झाले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना चार, राजे गट (भाजप) एक, मुश्रीफ माने गट एक, शिवसेना एक असे बलाबल झाले होते. सध्या मुश्रीफ, मंडलिक गटाची सत्ता आहे.

मंडलिक गटाचे उपसरपंच विक्रमसिंह जाधव, वीरश्री जाधव, रंजना माळी, स्वाभिमानी शेतकरीचे राहुल हेरवाडे, दीपक हेगडे, सारिका मगदूम, राजे गटाच्या पद्मावती जाधव या सात सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.

मासिक सभेचे इतिवृत्त न लिहिणे, इतिवृत्तात फेरबदल व खाडाखोड करणे, मासिक सभेत नोंदवलेले आक्षेप इतिवृतात न लिहिणे, १४ व्या वित्त आयोगाच्या खर्चाचे वाचन न करणे, सदस्यांनी माहिती मागितली असता ती न देणे, अशा मनमानी कारभाराला कंटाळून या सात सदस्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती विक्रमसिंह जाधव व राहुल हेरवाडे यांनी दिली.

याबाबत सरपंच रणजित कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चांगला कारभार सुरु आहे, विविध विकासकामे सुरु आहेत. राजीनामा दिलेल्या सात सदस्यांपैकी दोन सदस्य गत आठ महिन्यांपासून एकाही मासिक बैठकीला आलेले नाहीत, असे सांगितले.

-

---

फोटो कॅप्शन : कसबा सांगाव ग्रामपंचायतीत सरपंच रणजित कांबळे यांच्याकडे सदस्य पदाचा राजीनामा उपसरपंच विक्रमसिंह जाधव, सदस्य राहुल हेरवाडे, दीपक हेगडे, सारिका मगदूम, पद्मावती जाधव, रंजना माळी यांनी सुपूर्द केला. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस. पी. कांबळे उपस्थित होते.

Web Title: Seven members resign against arbitrary rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.