शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सेवेत कायम करा, १८ हजार वेतन द्या, आशा वर्कर्स युनियन : जिल्हा परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:19 IST

शासकीय सेवेत कायम करून किमान १८ हजार रुपये वेतन मिळावे, यांसह अन्य मागण्यांसाठी सिटू संलग्न कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने सोमवारी दुपारी जिल्हा

कोल्हापूर : शासकीय सेवेत कायम करून किमान १८ हजार रुपये वेतन मिळावे, यांसह अन्य मागण्यांसाठी सिटू संलग्न कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आशा कर्मचाऱ्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला.

रेल्वे स्टेशन परिसरातून आशा वर्कर्स युनियनच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, उपाध्यक्षा संगीता पाटील, उज्ज्वला पाटील, माया पाटील व मंदाकिनी कोडक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली़ विविध मागण्यांसह शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकी, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा जिल्हा परिषदेवर आला. गुलाबी रंगाच्या साड्या परिधान केलेल्या या आशा कर्मचाºयांच्या मोर्चाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

जिल्हा परिषदेसमोर आल्यानंतर या कर्मचाºयांनी जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. अखेर शिक्षण सभापती अंबरीश घाटगे आणि समाजकल्याण सभापती विशांत महापुरे यांनी मोर्चासमोर येत या सर्वांच्या मागण्या ऐकून घेतल्या. याबाबत पाठपुरावा करण्याचे मोर्चेकºयांना आश्वासन दिले.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (एन.आर.एच.एम.) अंतर्गत शहर व गावपातळीवर शासनाची आरोग्य सुविधा शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यात आशा व गटप्रवर्तक यांचे मोठे योगदान आहे़ शासकीय रुग्णालयातील प्रसूतीचे प्रमाण ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून, नवजात बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे़ मात्र, या कामाचा मोबदलाही चार ते सहा महिन्यांनी दिला जातो़ गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला़

मोर्चेकºयांच्या प्रतिनिधींनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोरे यांच्याशी चर्चा केली. संघटनेचे प्रा. सुभाष जाधव, प्रा. सुभाष मगदूम, शिवाजी मगदूम, आण्णासाहेब चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला़

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसाStrikeसंप