शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
2
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
3
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
4
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
5
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
6
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
7
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
8
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
9
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
10
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
11
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
12
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
13
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
14
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
15
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
16
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
17
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
18
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
19
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’च्या शिवारात लाखोंचे ‘सेटिंग’

By admin | Updated: May 25, 2017 01:19 IST

साखरी-म्हाळुंगे येथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर : हर्षल सुर्वेंना तीन लाख दिल्याचा दावा; आणखी लाख देण्याची आॅफर

लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : साखरी-म्हाळुंगे (ता. गगनबावडा) येथील ‘जलयुक्त शिवार’ योजनेंंतर्गत बांधलेल्या मातीबांध बंधाऱ्यांच्या निकृष्ट कामाचा पंचनामा करण्यासाठी बुधवारी गेलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी चक्क लाखोंची आॅफर दिली. हे प्रकरण मिटविण्यासाठी शिवसेनेचे युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांना तीन लाख दिल्याचे सांगत आणखी लाख रुपये देतो; पण हे प्रकरण वाढवू नये, अशी विनंती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोरच मोबाईलच्या स्पीकर फोनवर उघड झाल्याने एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी साखरी-म्हाळुंगे येथील बंधाऱ्यावर जाऊन निकृष्ट कामाचा भांडाफोड केला. अगोदर कल्पना देऊनही तालुका कृषी अधिकारी नामदेव परीट आले नसल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या समोर मोबाईलचा स्पीकर आॅन करून त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. पवार म्हणाले,‘तुम्ही कुठे आहात..? त्यावर परीट म्हणाले, ‘मी कोल्हापुरात आहे. मी तुम्हांला भेटायला येतो.’ त्यावर पवार म्हणाले, ‘भेटायला येऊ नका..तुम्हांला तीन आठवडे झाले सांगितले की कामांत ज्या त्रुटी आहेत त्या दुरुस्त करा म्हणून; परंतु तरीही तुम्ही त्या दुरुस्त केलेल्या नाहीत.’ त्यावर परीट यांनी माझे चुकले असल्याचे सांगितले आणि त्यांनी हा फोन तिथेच उभे असलेल्या शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश पाटील यांच्याकडे दिला.प्रकाश पाटील फोनवर म्हणाले, ‘पवारसाहेब मी तुमचाच कार्यकर्ता आहे. मी येऊन तुम्हाला भेटतो आणि विषय संपवतो.’ पवार त्यावर संतप्त होऊन म्हणाले, ‘मला हापूस देणार, तोतापुरी की पायरी देणार आहेस..? तू येऊन भेटतो म्हणतोस आणि तो येऊन भेटतो म्हणत आहे. त्यावर कार्यकर्त्याने परीट यांच्याकडे फोन दिला व परीट म्हणाले, ‘साहेब तुम्ही काय म्हणाल ते देतो. तुम्हाला हापूसच देतो.’ त्यावर संजय पवार म्हणाले, ‘हापूस म्हणजे किती देणार..? त्यावेळी परीट अडखळले व त्यांनी थेट तुमच्या सुर्वेंना तीन दिलेत त्यातील तुम्ही एक घ्या आणि आणखी एक आणून देतो असे सांगितले. त्यावर पवार भडकले. तुम्ही मला एक कोटी रुपये दिले तरी हा विषय थांबवणार नाही. हा प्रश्र्न शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विकत घऊ शकत नाही.’ त्यांनतर हा संवाद संपला; परंतु हा संवाद पत्रकारांच्या समोरच झाल्याने गैरव्यवहार चव्हाट्यावर आला.मुख्यमंत्र्यांनी पाणी मुरविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणली, पण तिथे पैसा मुरत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला. पैसे नेमके कोणाला दिले, याचा छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. मला तीन लाख दिल्याचा आरोप परीट यांनी केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे. - हर्षल सुर्वेजिल्हाप्रमुख, युवा सेनाआपण ‘हापूस’, ‘पायरी’ अशी भाषा बोललोच नाही. शिवसेनेचा कार्यकर्ताच अशी आॅफर देत होता. त्यामुळे या वक्तव्याशी काहीच संबंध नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. या बंधाऱ्याच्या कामाचा एक रुपयाही दिलेला नाही, चौकशीत दोषी आढळल्यास निश्चित कारवाई होईल. - नामदेव परीट, कृषी अधिकारी, गगनबावडाबंधारे चुकीच्या ठिकाणी बांधले आहेतच, पण कामेही अतिशय निकृष्ट केली आहेत. कृषी अधिकारी, ठेकेदारांनी संगनमताने सरकारच्या पैशांवर दरोडा घातला आहे. ‘जलयुक्त’च्या कामाबाबत मुख्यमंत्री महोदयांचा दावा फोल ठरला असून, जिल्ह्यातील सर्व कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी. - संजय पवार, जिल्हाप्रमुख,शिवसेनादृष्टिक्षेपात बंधारेठेकेदार - जयंत अनंत नाईक एकूण बंधारे - २०एकूण खर्च - ८० लाख रूपये क्षमता - २२.४८ टीसीएमएका बंधाराचा खर्च - ५ लाख २७ हजार ३१० रुपये मातीच्या ढिगाऱ्याला मुरुमाचे पिचिंग‘जलयुक्त’ची निकृष्ट कामे : साखरी-म्हाळुंगे येथील कामाचा सेनेकडून पंचनामालोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गगनबावडा तालुक्यात जलयुक्त शिवार अंतर्गत १८ ठिकाणी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या मातीनाला बंधाऱ्यांचा शिवसेनेने बुधवारी पंचनामा केला. साखरी-म्हाळुंगे येथील कामात मातीच्या ढिगाऱ्यावर चक्क ढिसूळ जांभा दगडाच्या कपरा लावून पिचिंग करण्याचा प्रताप ठेकेदाराने केला आहे. त्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांसह सर्वच यंत्रणेचे हात पावसाळा आधीच ओले केल्याने या तळ्यात पाणी मुरण्याची शक्यता कमी असली तरी पावसाळ्याआधीच पैसा निश्चित मुरल्याचे स्पष्ट होते. गगनबावडा तालुक्यात ‘जलयुक्त’ अंतर्गत २० बंधारे बांधण्यात आले आहेत, त्यापैकी अठरा कामे ही साखरी-म्हाळुंगे परिसरात झाली असून, त्यासाठी ६७ लाख रुपये खर्च झाला आहे. ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे शिवसेनेचे कार्यकर्ते शहाजी देसाई यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे यांच्या (पान ६ वर )