गडहिंग्लजला सार्वजनिक क्रीडा संकुल उभे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:00+5:302020-12-05T04:55:00+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर हे ‘फुटबॉल पंढरी’ म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश संपादन ...

Set up a public sports complex at Gadhinglaj | गडहिंग्लजला सार्वजनिक क्रीडा संकुल उभे करा

गडहिंग्लजला सार्वजनिक क्रीडा संकुल उभे करा

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहर हे ‘फुटबॉल पंढरी’ म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील अनेक खेळाडूंनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले आहे; परंतु, खेळाडूंना सरावासाठी शहरात मोठे क्रीडांगण उपलब्ध नाही. त्यामुळे गडहिंग्लजला स्वतंत्र क्रीडा संकुल उभे करावे, अशी मागणी गडहिंग्लजमधील सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू व क्रीडाप्रेमींनी निवेदनातून जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, शहरातील शिवराज महाविद्यालय आणि एम. आर. हायस्कूलचे मैदान वगळता अन्यत्र कोठेही क्रीडांगण उपलब्ध नाही. १० वर्षापूर्वी तालुक्यासाठी क्रीडा संकुल उभारण्यासाठी मंजुरी मिळाली. शासनाकडून निधीही प्राप्त झाला. मात्र, जागेअभावी क्रीडा संकुलाचा आलेला निधी परत गेला. ते आजतागायत क्रीडा संकुलाचे काम रखडले आहे.

जागेमुळे क्रीडा संकुलाचे काम रखडल्याने क्रीडा संकुलासाठी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी क्रीडाप्रेमींनी जिल्हा परिषदेच्या एम. आर. हायस्कूलच्या वडरगे रोडवरील शेती शाळेची जागा सुचविली आहे. सध्या ही जागा दुर्लक्षित व वापराविना पडून आहे. जागेसंदर्भातील सर्व कागदपत्रे, नकाशा उपलब्ध केला असून ही जागा क्रीडा संकुलासाठी अत्यंत सोयीची आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर सोपस्कार पार पाडून शहराला सुसज्ज व सर्व सोयीनियुक्त क्रीडा संकुल उपलब्ध होईल.

निवेदनावर, संग्रामसिंह नलवडे, सुनील शिंत्रे, दीपक कुपन्नावर, अरविंद बारदेस्कर, मनिषा कोले, अनिल कुराडे, रमजान अत्तार, विनायक नाईक, संपत सावंत, राजाराम माने, अनिल पाटील, विनोद शिंदे, रफिक पटेल, संजय देसाई, सुनीता नाईक, गंगाराम शिंदे, भागोराव वाघमारे, रमण लोहार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Set up a public sports complex at Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.