शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्राच्या ठिकाणी मदत कक्ष स्थापन करा  :दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 10:36 IST

elecation, pune,collcatoroffice, kolhapurnews पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष स्थापन करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य देण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केली.

ठळक मुद्देमतदान केंद्राच्या ठिकाणी मदत कक्ष स्थापन करा  :दौलत देसाईपुणे पदवीधर निवडणुकीच्या तयारीचा आढावा

कोल्हापूर : पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी. जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष स्थापन करावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य देण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केली.पुणे पदवीधर निवडणुकीच्या पूर्वतयारी व नियोजनाबाबत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी देसाई यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या निवडणुकीसाठी मोठी मतपत्रिका होणार असल्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मतपत्रिकेची घडी कशी घालावी याबाबत सर्वांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

मतदान केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. मदत कक्षासाठी तालुका आरोग्याधिकारी यांनी समन्वयक अधिकारी म्हणून काम करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारांना मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करणे महत्त्वाचे असून यासाठी महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी महापालिका क्षेत्रासाठी काम पाहावे, अशी सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह सर्व नोडल अधिकारी, समन्वय अधिकारी उपस्थित होते.सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग आवश्यककोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग करणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी अखंडित वीजपुरवठा राहील यांची खबरदारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्य पर्यायी व्यवस्थाही करून ठेवावी. मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफीची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली.

टॅग्स :Electionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूरPuneपुणे