शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
2
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
3
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
4
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
5
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
6
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
7
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
8
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
9
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
10
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
11
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
12
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
13
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
14
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
15
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
16
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
17
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
18
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
19
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
20
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव

चोवीस तासात कामावर हजर न राहिल्यास सेवा संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:53 IST

zp, kolhapurnews कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेचे काम नाकारणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी चोवीस तासात कामावर व्हावे अन्यथा त्यांच्या सेवा संपुष्टात आणाव्यात व त्यांच्या ठिकाणी नवीन आशा स्वयंसेविका नियुक्ती कराव्यात असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी गुरुवारी रात्री दिला.

ठळक मुद्देचोवीस तासात कामावर हजर न राहिल्यास सेवा संपुष्टात सीईओंचा इशारा : आशा वर्कर्सकडून नाराजी

 कोल्हापूर : कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेचे काम नाकारणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी चोवीस तासात कामावर व्हावे अन्यथा त्यांच्या सेवा संपुष्टात आणाव्यात व त्यांच्या ठिकाणी नवीन आशा स्वयंसेविका नियुक्ती कराव्यात असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी गुरुवारी रात्री दिला. यासंदर्भात पंचायत समितीकडील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथिमक आरोग्य केंद्राकडील वैद्यकिय अधिकारी यांना तसे आदेश काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.राज्यात सक्रिय कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिम दि. १ ते दि. १६ आक्टोबर या कालवधित राबविण्याच्या सूचना आशा स्वयंसेविकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम करण्याऐवजी त्यांनी ते नाकारले आहे.

आशा स्वयंसेविकांना मंजूर झालेले वाढीव मानधन न मिळाल्यामुळे त्यांनी सदर मोहिम राबविण्यास स्पष्ट नकार दिला असून तसे निवेदन जिल्हा एकात्मिक आरोग्य व कु. क. सोसायटी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना देण्यात आले होते. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होऊन राज्यस्तरावरुन अनुदान प्राप्त होताच आशा स्वयंसेविकांचे सर्व थकित मानधन अदा करण्याचे आश्वासन दिले. तरीही मोहिमेत काम करण्यास नकार दिला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून पंचायत समितीकडील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व प्राथिमक आरोग्य केंद्राकडील वैद्यकिय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आशा स्वयंसेविकांना चोवीस तासात कामावर हजर व्हा अन्यथा त्यांच्या जागी नवीन नियुक्त्या करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश काढण्याचे फर्मान सोडले.अधिकाऱ्यांनी विनापगार काम करावे-कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन जिल्हा सचिव उज्वला पाटील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आमचे कुटुंब प्रमुखच जर कार्यमुक्तीचे आदेश देणार असतील तर ते आमचे दुर्दैव म्हणावे लागेल, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्यावर दबाव आणणाऱ्या अधिकाऱ्यांनी चार महिने पगार न घेता काम करावेत, आमचे मानधन मिळाल्यावरच त्यांनी पगार घ्यावेत असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर