सेवाकरामुळे खिशाला चाट, आॅनलाईन पेमेंटधारकांनाही भुर्दंड
By Admin | Updated: June 3, 2015 01:05 IST2015-06-03T00:34:01+5:302015-06-03T01:05:32+5:30
कोल्हापूर शहरातून सेवाकराद्वारे शासनाला दरवर्षी १६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते़ वाढीव सेवाकरांमुळे या उत्पन्नात सुमारे पावणेदोन कोटींची भर पडणार

सेवाकरामुळे खिशाला चाट, आॅनलाईन पेमेंटधारकांनाही भुर्दंड
कोल्हापूर : सेवाकरातील वाढ सोमवारपासून लागू झाली आहे़ गत आर्थिक वर्षात १२़३६ टक्के असलेला सेवाकर यावर्षीपासून आता चौदा टक्के करण्यात आला आहे़ या वाढीव सेवाकरांमुळे बँकिंग, पर्यटन, हॉटेल, रेस्टॉरंट, विमा, बांधकाम, के्रडिट कार्ड, आर्किटेक्ट, खासगी कोचिंग क्लास या क्षेत्रातील सेवा महागणार आहेत. आॅनलाईन पेमेंटपद्धती वापरणाऱ्यांना मात्र उपभोग घेतलेली सेवा आणि सेवेच्या बिलांची पूर्तता असा दुहेरी भुर्दंड बसणार आहे़ कारण आॅनलाईन पेमेंट सेवा ही सेवाकराच्या कक्षेत आहे़ अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ साठी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षासाठी सेवाकराची आकारणी १४ टक्के इतकी केली आहे़ या वाढीव सेवाकरामुळे अगोदरपासून महागाईच्या गर्तेत अडकलेल्या नागरिकांच्या खिशाला चाट बसणार आहे़ कारण सेवा कर हा अप्रत्यक्ष कर असतो़ हा कर सेवा देणारा भरत असला तरी, त्याची वसुली ग्राहकांच्या खिशांमधूनच केली जाते़ एप्रिल ते सप्टेंबर आणि आॅक्टोबर ते मार्च या कालावधीत सेवाकराचे रिर्टन आॅनलाईन भरले जातात़ यावर्षी हा कर १ जूनपासून लागू झाल्यामुळे पूर्ण वर्षाचा कर भरण्यापासून करदात्यांची सुटका झाली आहे़
कोल्हापूर शहरात ५०५० सेवाकर दाते आहेत़ यामध्ये प्रामुख्याने हॉटेल्स, रेस्टॉँरंट, बांधकाम, आदी क्षेत्रांतील सेवाकर दात्यांचा समावेश आहे़ कोल्हापूर शहरातून सेवाकराद्वारे शासनाला दरवर्षी १६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते़ वाढीव सेवाकरांमुळे या उत्पन्नात सुमारे पावणेदोन कोटींची भर पडणार आहे़ निगेटिव्ह यादीतील कृषी क्षेत्राशी संबंधित सेवा तसेच रिझर्व्ह बँकेकडून दिल्या जाणाऱ्या सेवांना हा कर लागू नाही़ अशी माहिती कोल्हापूर सेवाकर विभागाचे अधीक्षक संदीप विचारे यांनी दिली़ (प्रतिन् िाधी)
आॅनलाईन पेमेंट करणाऱ्यांना दुहेरी चाट
अनेक ग्राहक विविध प्रकारची पेमेंट करण्यासाठी के्रडिट आणि डेबिट कार्डचा वापर करतात़ दोन हजार रुपयांपर्यंतचे आॅनलाईन पेमेंट सेवाकर मुक्त होते़; पण ही मर्यादा एका व्यवहारासाठी दोन हजारांहून पाचशे रुपयांपर्यंत करण्यात आली आहे़ त्यामुळे घेतलेल्या सेवेपोटी पाचशेपेक्षा जास्त रुपयांचे आॅनलाईन पेमेंट करणाऱ्यांना ग्राहकांना वाढीव सेवाकराबरोबरच डेबिट व के्रडिट कार्डच्या सेवेसासाठीही सेवाकर असा दुहेरी भुर्दंड सहन करावा लागणार आहे़
हायलाईट्स : सेवाकर
सेवाकर हा अप्रत्यक्ष कर आहे़
१९९४ पासून लागू
कोल्हापुरातील सेवाकर दात्यांची अंदाजित संख्या : ५०५०
करातून मिळणारे उत्पन्न : १६० कोटी