इचलकरंजीत यशोलक्ष्मी भवनमध्ये विलगीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST2021-05-31T04:18:15+5:302021-05-31T04:18:15+5:30
इचलकरंजी : येथील यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे नगरपालिकेच्या वतीने व बाबूलाल मालू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ५४ बेडचे सुसज्ज असे ...

इचलकरंजीत यशोलक्ष्मी भवनमध्ये विलगीकरण केंद्र सुरू
इचलकरंजी : येथील यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे नगरपालिकेच्या वतीने व बाबूलाल मालू चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ५४ बेडचे सुसज्ज असे विलगीकरण केंद्र सुरू झाले आहे. त्याचे उद्घाटन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी केले. या वेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, संध्या बनसोडे, सारिका पाटील, नगरसेवक अजित जाधव, किसन शिंदे, राजू बोंद्रे, सुनील महाजन, शहाजी भोसले व पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी
३००५२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत यशोलक्ष्मी भवनमध्ये विलगीकरण केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी फित कापून केले. या वेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, तानाजी पोवार, अशोक स्वामी, आदी उपस्थित होते.