६० वर्षांपुढील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी वेगळी रांग -पालकमंत्री सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:24 IST2021-05-14T04:24:36+5:302021-05-14T04:24:36+5:30

कोल्हापूर : लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी होत असून, यामध्ये ६० वर्षांपुढील ज्येष्ठांची सोय व्हावी, त्यांना दिवसभर रांगेत थांबायला लागू नये, ...

Separate queue for vaccination of senior citizens below 60 years - Guardian Minister Satej Patil | ६० वर्षांपुढील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी वेगळी रांग -पालकमंत्री सतेज पाटील

६० वर्षांपुढील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी वेगळी रांग -पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर : लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी होत असून, यामध्ये ६० वर्षांपुढील ज्येष्ठांची सोय व्हावी, त्यांना दिवसभर रांगेत थांबायला लागू नये, यासाठी त्यांची स्वतंत्र वेगळी रांग करावी, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी केली.

जिल्ह्यातील केंद्रांवर सर्वच ठिकाणी ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी होत आहे. यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठांना थांबावे लागते. यात अनेक जण इतर आजारांनी ग्रस्त असतात. अशा ज्येष्ठांची सोय व्हावी, त्यांना त्रास होऊ नये, त्यांचे लसीकरण सहजरीत्या व्हावे, त्यासाठी त्यांची वेगळी स्वतंत्र रांग करावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.

Web Title: Separate queue for vaccination of senior citizens below 60 years - Guardian Minister Satej Patil