वीजदरामध्ये ‘यंत्रमाग’ला वेगळी वर्गवारी

By Admin | Updated: July 3, 2015 00:55 IST2015-07-03T00:55:15+5:302015-07-03T00:55:15+5:30

सुरेश हाळवणकर : डिसेंबर २0१४ पेक्षा वीजदर कमी होणार

A separate category for 'Yogranaga' in the power supply | वीजदरामध्ये ‘यंत्रमाग’ला वेगळी वर्गवारी

वीजदरामध्ये ‘यंत्रमाग’ला वेगळी वर्गवारी

इचलकरंजी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या यंत्रमाग व्यवसायाला वीजदरामध्ये वेगळी वर्गवारी करावी, ही मागणी मान्य करत वीज नियामक आयोगाने यंत्रमाग व्यवसायाला स्वतंत्र वर्गवारी घोषित केली आहे. त्याचबरोबर डिसेंबर २०१४ च्या दरपत्रकानुसार सध्या जाहीर झालेला दर कमी करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
औद्योगिक व्यवसायामध्येच यंत्रमाग व्यवसायाचा समावेश होत असल्याने वेगळ्या वीजदराची योजना राबविता येत नव्हती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारी करावी, अशी मागणी होती. या मागणीचा पाठपुरावा करत ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्यासह बैठक घेऊन वीज नियामक आयोगाच्या पुणे येथे झालेल्या जाहीर सुनावणीवेळी यंत्रमाग क्षेत्रातील सर्व आमदारांच्या एकत्रित सहीचे निवेदन देऊन शासनाने वीज नियामक आयोगाला शिफारस केली. त्यानुसार आयोगाने ही घोषणा केली आहे.
तसेच डिसेंबर २०१४ च्या दरामध्ये व आता लागू केलेल्या दरामध्ये वीस किलो वॅट भारपेक्षा कमी असलेल्या ग्राहकांसाठी ७२ पैसे, तर वीस किलो वॅटपेक्षा अधिक भार असणाऱ्या यंत्रमागधारकांना एक रुपये ८७ पैसे दर कमी करण्यात आल्याचेही पत्रकात म्हटले आहे. यामुळे यंत्रमागासाठी वीजदरासंदर्भातील विविध योजनाही राबविण्यास सुलभ होणार आहे.

Web Title: A separate category for 'Yogranaga' in the power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.